लोकमान्य टिळक विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज 40 वर्षे गोरगरीब मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी झटणारी शाळा
शाकाहारी, मांसाहारी जेवणासह, विद्यार्थांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष
*दापोली प्रतिनिधी
ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणाचे दार खुले व्हावे आणि मुंबईसारख्या मोठया शहरात जाऊन महागडे शिक्षण घेण्यापेक्षा आपल्या ग्रामीण भागातील मुलांना येथेच सर्व सोयींनीयुक्त अत्याधुनिक शिक्षण मिळावे यासाठी लोकमान्य टिळक विद्यामंदिर,ज्युनिअर कॉलेज गेली 40 वर्षे झटत आहे. या संस्थेने गृह, आरोग्य, इलेक्ट्रिकल, इंजिनिअरिंग, शेती, पशुपालन अशा विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी घेत कोकणात अत्याधुनिक शिक्षण देणारी शाळा ठरली आहे. येथे मुलांना व्हेज, नॉनव्हेजचे उत्तम प्रकारचे जेवण देऊन मुलांना सुदृढ बनवण्याचे काम संस्था करत आहे.
लोकमान्य पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट पुणे संचलित लोकमान्य टिळक विद्यालय, ज्युनिअर कॉलेज, चिखलगाव या शाळेत इ पहिली ते बारावीपर्यंतचे शिक्षण दिले जाते. येथे 100 मुलांचे व 100 मुलींचे अत्याधुनिक वसतिगृह आहे. तसेच ई. 5 वी पासून व्यवसाय शिक्षण देणारी ही कोकणातील शाळा आहे. ई 10 वी व 12 वीचे सातत्याने 100% निकाल तसेच क्रीडा विषयात विभागीय पातळीपर्यंत मुले जाऊन पोचली आहेत. ड्रॉइंग ग्रेड परीक्षा, विविध स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन ही केले जाते. अतिशय माफक फी मध्ये वसतिगृह, उत्तम व दर्जेदार शिक्षण शाळेत उपलब्ध आहे अशी माहिती संस्थाचालकांनी दिली
ग्रामीण भागातील मुलांना गावातच शिक्षण मिळावे, त्यांना गावातच रोजगार मिळावा यासाठी प्रयत्न केले आहेत. मुंबईमध्ये मोठया प्रमाणात फी आकारून विद्यार्थांना शिक्षण देणाऱ्या संस्था आहे. मात्र दापोलितील या शाळेने विद्यार्थांना कमी खर्चात अनेक सुविधा दिल्या आहेत. गृह / आरोग्य, इलेक्ट्रिकल, ईजिनिअरिंग , शेती/ पशुपालन असे शालेय अभ्यासक्रम उपलब्ध करून दिले आहेत. या शाळेतील मुलांनी लिहिलेली पुस्तके प्रकाशित करून त्यांना प्रोत्साहित करण्यात येते. या शाळेचे प्रशस्त क्रीडांगण आहे. या शाळेत 300 विद्यार्थी असून क्रीडा क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली आहे.
तसेच ज्या मला मुलींना शिक्षण घेणे आणि राहण्याची व्यवस्था सोय व्हावी यासाठी सुसज्ज आणि सुरक्षित वसती गृह उभारण्यात आले आहे. या वसती गृहात 100 मुले व 100 मुलींसाठी अद्ययावत सोयी सुविधा देण्यात आल्या आहेत. तसेच मुलांना गरम पाण्याची सोय, शाकाहारी/ मांसाहारी जेवण उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामुळे मुलांना ही शाळा म्हणजे दुसरे घरचं असल्याचे भासत आहे.
विद्यार्थांना संध्याकाळी अभ्यासिका English, गणित विषयांकडे लक्ष दिले जाते. यासाठी उच्चशिक्षित शिक्षक वर्ग अहोरात्र मेहनत घेत आहे. विविध क्रिडा स्पर्धेत सहभाग घेऊन शाळेतील विद्यार्थी प्रावीण्य मिळवत आहेत.
10 वी पासून विद्यार्थांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केले जात असून त्यांना एमपीएससी, यूपीएससी स्पर्धांचे महत्व पटवून दिले जात आहे. Hobby class ची सोय करण्यात आली आहे. विद्यार्थांसाठी स्वतंत्र बेड, कपाटाची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्या राहणीमानात उच्च दर्जा जपण्याचा संस्थेने प्रयत्न केला आहे. या साऱ्या सुविधा अतिशय माफक दरात विद्यार्थांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या. ग्रामीण भागातील पालकांचा विचार करूनच शाळेने पाऊल उचलले आहे.
ग्रामीण भागातील गरजू, गरीब, विद्यार्थ्यांनी या शाळेत प्रवेश घेऊन आपल्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे आवाहन शाळेतर्फे करण्यात आले आहे. या शाळेत पुढील वर्षीचे प्रवेश सुरू झाले आहेत. तरी आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी धनश्री दांडेकर: 7499818565/ what’s app: 9404161451 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन संस्थेच्या वतीनेकरण्यात आले आहे.
