*सिंधुदुर्ग*
कुडाळ येथे आज सिंधुदुर्ग पोलिसांच्या वतीने ज्येष्ठ नागरिक मेळावा संपन्न झाला या मेळाव्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेल्या हेल्पलाइनचे लोकार्पण केले. सिंधुदुर्ग जिल्हा हा आमचं कुटुंब आहे या कुटुंबातील प्रत्येकाची सुरक्षा आणि त्यांना विश्वास देण्याची जबाबदारी आमच्याबरोबरच प्रशासनाची आहे. यावेळी पोलीस विभागाच्या कार्यक्षमतेचे आणि तत्परतेचे कौतुक केले.
*कोकणातून आणि मराठवाड्यातून येणारे हेल्पलाइन वरील कॉल मध्ये फरक नितेश राणे
मराठवाड्यातून मुंबईतून आणि अन्य ठिकाणाहून येणारे हेल्पलाइन मधील कॉल व आमच्या कोकणातून येणारे हेल्प लाईनवरील कॉल यामध्ये फरक आहे कोकणातला माणूस शक्यतो वाद करत नाही तो समाधानी असतो तो कर्जही पूर्ण भरतो म्हणून आमचा बँकेचा एमपीएही शून्य टक्के असतो म्हणून सरकारने पन्नास हजार रुपये मध्यंतरी प्रोत्साहन पर दिले म्हणून कोकणाकडे पाण्याचा दृष्टिकोन जरा बदला अशीही प्रेमळ सूचना मंत्री नितेश राणे यांनी पोलीस प्रशासनाला केली.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी कोकणचे पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांनी सांगितले की, आजपासून ही हेल्पलाइन डिस्टन्स साठी सुरू झाली आहे तुम्हाला कोणतीही अडचणी येऊ द्या तुम्ही आम्हाला या नंबर वर कॉल करा तुमची मदत केली जाईल असे शब्द त्यांनी जेष्ठ नागरिकांना अशा शब्दात त्यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी आश्वस्थ केले.
सदर कार्यक्रम प्रसंगी आमदार माजी मंत्री दीपक केसरकर, विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे, पद्मश्री परशुराम गंगावणे, पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अपर अधीक्षक कृषिकेश रावले, ज्येष्ठ लेखिका वृंदा कांबळी, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष भालचंद्र मराठे आदी उपस्थित होते.

