दापोली प्रतिनिधी
जिल्हा स्तरीय दिव्यांग मुलांच्या कीडा स्पर्धा सन २०२४-२५चे आयोजन जिल्हा परिषद रत्नागिरी समाजकल्याण विभाग, लायन्स क्लव रत्नागिरी व अविष्कार संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ९.१०.११ जानेवारी २०२५ रोजी पोलीस परेड ग्राउंड जेल रोड रत्नागिरी येथे करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन मंत्री ना.उदय सामंत तसेच किर्ती किरण पुजार प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी,जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, पोलीस अधिक्षक, परिक्षित यादव अतिरिक्त मुख्य कार्यकारी आधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी आदी मान्यवर उपस्थित होते.
या विद्यालयातील विद्यार्थी वयोगट ८ ते १२ मध्ये कु. अर्णव नामदेव खोपटकर ५० मी. धावणे प्रथम कमांक मॅरेथॉन मध्ये तृतीय कमांक, कु. रोहीत रामदास चोगले ५० मी. धावणे तृतीय,लांब उडी तृतीय कमांक, मॅरेथॉन व्दितीय कमांक पटकावला. कु. शुभ्रा सागर कांबळे ५० मी. धावणे प्रथम, लांब उडी व्दितीय कमांक पटकावला कु. आरोही सुदेश जगदाळे ५० मी. धावणे व्दितीय, लांव उडी प्रथम कमांक पटकावला. मॅरेथॉन स्पर्धेत व्दितीय क्रमांक पटकावला वयोगट १३ ते १६ मध्ये कु. विराज विलास मयेकर १०० मी. धावणे व्दितीय, गोळा फेक तृतीय, मॅरेथॉन व्दितीय कमांक कु. आदित्य अनिल भडवळकर १०० मी. धावणे तृतीय कमांक. कु. सर्वेश देवदास वाडकर गोळा फेक प्रथम, लांब उड़ी प्रथम, मॅरेथॉन मध्ये प्रथम कमांक पटकावला. कु. अर्पिता शशिकांत पवार १०० मी. धावणे प्रथम, लांब उडी प्रथम, मॅरेथॉन मध्ये प्रथम कमांक पटकावला. कु. तनुजा राजू जोगले १०० मी. धावणे व्दितीय, मॅरेथॉन मध्ये व्दितीय क्रमांक पटकावला. कु. तेजल दिनेश कदम लांब उडी व्दितीय, गोळा फेक प्रथम. कु. शौर्या व्दारकानाथ जाक्कर ने गोळा फेक मध्ये तृतीय कमांक पटकावला.
विद्यालयातील विद्याथ्यांनी या स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळवले आहे. सदर स्पर्धेत दापोली, चिपळूण, खेड, गुहागर, लांजा, रत्नागिरी, मंडणगड येथून दिव्यांग स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यामध्ये इंदिराबाई वामन वडे कर्णबधिर विद्यालय दापोलीच्या १५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या उत्कृष्ट यशायद्दल विद्यलयाच्या विद्यार्थ्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे. या यश संपादन करणा-या विद्यार्थ्यांना विद्यालयातील शिक्षक, कर्मचारी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले होते. स्नेहदीप दापोली संस्थेचे पदाधिकारी, विद्यालयाचे पदाधिकारी, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी व पालकवर्ग यांनी अभिनंदन केले आहे.
