दापोली प्रतिनिधी
विद्यार्थी, पालक व शिक्षक, संस्थाचालक यांचा गटशिक्षणाधिकारी मां. श्री. अण्णासाहेब बळवंतराव साहेब व विरसई जनसेवा मंडळाने यांनी केले सर्वांचे सत्कार व अभिनंदन..
जाणू विज्ञान अनुभवू विज्ञान या जिल्हा परिषद रत्नागिरीच्या सेस योजनेतून नासा अमेरिका व इस्रो भारत भेट हा उपक्रम गेली तीन वर्षे सुरू आहे. नुकतीच जिल्हा परिषदेमार्फत अंतिम मुलाखत व प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात आली. यामध्ये दापोली तालुक्यातून 10 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. यामध्ये सर्वाधिक विद्यार्थी जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक मराठी आदर्श शाळा विरसई
येथील तीन विद्यार्थी सहभागी झाले होते. दापोली तालुक्यापासून आदर्शगाव विरसई हे गाव सुमारे 35 किमी अंतरावर असून ग्रामीण व दुर्गम आहे. यामध्ये कुमारी जान्हवी राजेंद्र तांबुटकर (सातवी) हीची नासा या अमेरिका अवकाश संशोधन संस्थेस अभ्यासदौरा व कुमार विनित विनय राणे (पाचवी), कुमार अथर्व गणेश तांबिटकर (सातवी) यांची इस्रो भारत या संस्थेस अभ्यासदौऱ्यासाठी निवड झाली. याप्रसंगी दापोली तालुक्याचे गटशिक्षणअधिकारी मां. श्री. अण्णासाहेब बळवंतराव यांनी विद्यार्थी, पालक, शिक्षक व ग्रामस्थ आणि सर्व सदस्य यांचे विशेष अभिनंदन व सत्कार केले. दुर्गम भागात असलेल्या विरसई गावाने शिक्षण व कृषी क्षेत्राचे विविध पुरस्कार प्राप्त केले आहेत. मागील वर्षी जान्हवी राजेंद्र तांबुटकर हीची इस्रो अभ्यासदौऱ्यासाठी निवड झाली होती. तसेच मुख्याध्यापक श्री. संदीप भेकत यांनी सलग तीन वर्षे नासा व इस्रो या अंतिम परीक्षेत गरीब कुटुंबातील मुलांना यश संपादन करून तालुक्यात वेगळे स्थान निर्माण केले. तसेच यावेळी विरेश्वर विद्यालय विरसईने मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा टप्पा 2 तालुक्यामध्ये द्वितीय क्रमांक व प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना अंतर्गत परसबाग निर्मिती स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त झाल्याबद्दल विद्यालयाचे चेअरमन श्री. अनिल पिंपळकर, मुख्याध्यापक श्री. सुनीलकुमार गोरीवले, तसेच विरसई येथील समाजसेवक श्री. राजेंद्र पाटील यांनी विद्यार्थ्यांना लीला हिरा फाऊंडेशन यांचेकडून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आर्थिक मदत मिळवून दिल्याबद्दल मां. गटशिक्षणाधिकारी आणासाहेब बळवंतराव यांनी सत्कार केले. तसेच केंद्रप्रमुख मां. दिनकर क्षीरसागर व विरेश्र्वर विद्यालयाच्या वतीनेही सर्व नासा इस्रो पात्र मुलांचा सत्कार व अभिनंदन करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना मां. गटशिक्षणाधिकारी श्री. बळवंतराव साहेबांनी मुलांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व त्यासोबत नासा साठी पात्र कुडावले येथील अंशुल पाटील व इस्रो साठी हर्णे येथील श्रूष्ठी चौधरी, मळे येथील आयुष पांदे व जोगळे नंबर 1 येथील हर्ष कांबळे या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. तसेच गाव व शाळा यांना मिळालेल्या विविध पुरस्काराबाबत शिक्षक व ग्रामस्थांचेही कौतुक केले.
यावेळी विरसई गावातील दोन्ही प्राथमिक, माध्यमिक शाळां व अंगणवाडी यांचे संयुक्तिक वनभोजन व वार्षिक क्रीडामहोत्सव याचेही आयोजन शाळा व्यवस्थापन समिती, विरसई जनसेवा मंडळ व विरसई जनसेवा महिला मंडळ यांच्या सहकार्याने करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षक श्री. संदीप भेकत, श्री. विनय राणे, श्री. मुरलीधर शिरसाठ, श्रीम. कविता भोये, तसेच विरेश्र्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. सुनिलकुमार गोरिवले, श्री. राजाराम हिंग्लजे, श्री. विजय धनवडे तसेच विज्ञान फिरती प्रयोगशाळा संचालक श्री. दिनेश नाटेकर, सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी मां. आयरे सर, श्री. विनेश साळवी, श्री. गुंजाळ सर आदींनी मार्गदर्शन केले.
याबद्दल पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी मां. श्री. अण्णासाहेब बळवंतराव, केंद्रप्रमुख श्री. दिनकर क्षीरसागर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. सुभाष पिंपळकर, विरसई जनसेवा मंडळाचे अध्यक्ष श्री. नंदकुमार धोत्रे, श्री. कृष्णा राणे, सचिव श्री. सुरेश बेटकर, श्री. अनिल पिंपळकर, सरपंच सौ. मनोरमा राणे, कृषी विस्तार अधिकारी श्री. दिनेश राणे सर, श्री. ग्रामसेवक श्री. विरेश कदम, तंटामुक्त समिती अध्यक्ष श्री. संजय पिंपळकर, श्री. सुनिल राणे सर विरेश्र्वर विद्यालय विरसईचे मुख्याध्यापक श्री. सुनीलकुमार गोरीवले, विरसई जनसेवा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. सुनिता जाधव, सचिव सौ. सारिका राणे, माजी अध्यक्षा श्रीमती सुलोचना राणे, मंडळाचे माजी अध्यक्ष श्री. हरी राणे, ग्रामपंचायत सदस्य श्री. शिवाजी जाधव, सौ. मानसी राणे, सौ. भाविका राणे, माजी सरपंच सुरेश वडतकर, श्री. गणपत भुवड, उपसरपंच श्री. विद्यार्थ जाधव सर्व ग्रामस्थ, पालक, माजी विद्यार्थी यातून अभिनंदन करण्यात येत आहे. यावेळी संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन शाळा व्यवस्थापन समिती, दोन्ही शाळांतील शिक्षकवृंद, विरसई जनसेवा मंडळ व महिला मंडळ यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक श्री. विनय राणे व श्री. राजाराम हिंगलजे व आभाप्रदर्शन केंद्रप्रमुख श्री. दिनकर क्षीरसागर यांनी केले.
