डॉ.विद्या दिवाण ,रुचिता नलावडे यांनी केल विद्यार्थिनी व महिलांना मार्गदर्शन
दापोली प्रतिनिधी
नवरत्न शिक्षण संस्था आणि सारंग पंचक्रोशी माध्यमिक विद्यालयाच्या रौप्य महोत्सवी सोहळा सारंग येथे नुकताच संपन्न झाला.रौप्य महोत्सवी सोहळ्याचे औचित्य साधून संस्थेच्या वतीने सारंग पंचक्रोशी व परिसरातील सर्व नागरिकांसाठी व विद्यार्थ्यांसाठी मोफत नेत्र चिकित्सा शिबिर व मोफत चष्मे वाटप शिबिर आयोजित करण्यात आले होते साधू वासवानी ट्रस्ट पुणे अंतर्गत येणाऱ्या बुधरानी हॉस्पिटल पुणे येथील तज्ञ टेक्निशियन गिरीश पाटील व शुभम बाजारे यांच्या सहाय्याने लोकांची नेत्रचिकित्सा करण्यात आली ज्या नागरिकांना नंबर लागलेले आहेत अशा सर्व ग्रामस्थ व महिलांना संस्थेच्या वतीने मोफत चष्मे वाटप करण्यात आले यासाठी य रा कुटरेकर विद्यालय पंचनदी चे माजी मुख्याध्यापक सुनील देसाई तसेच माझी सहेली ट्रस्टचे संस्थापक अविनाश चव्हाण यांच्या सहकार्याने हे शिबिर घेण्यात आले. तसेच “माझी सहेली चॅरीटेबल ट्रस्ट”च्या वतीने परिसरातील महिला व किशोरवयीन मुलींना चांगल्या दर्जाचे मोफत सॅनिटरी पॅड नॅपकिन वाटप करण्यात आले त्यानंतर श्री. पाते यांनी महिलांना आरोग्य विषयक मार्गदर्शन केले तसेच संस्थेच्या हितचिंतक व दापोलीतील प्रख्यात डॉ. विद्या दिवाण व लोक कल्याण समितीच्या सदस्या रुचिता नलावडे यांनी परिसरातील सर्व महिलांना आरोग्य विषयक मार्गदर्शन केले रौप्य महोत्सवी सोहळ्याचे औचित्य साधून विद्यालयांमध्ये सत्यनारायण पूजा व महिलांसाठी हळदीकुंकू समारंभाचे सुद्धा आयोजन करण्यात आले पंचक्रोशीतील नऊ गावातील महिला व ग्रामस्थ वरील सर्व कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते या संपूर्ण कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष शांताराम पवार उपाध्यक्ष, नरेंद्र करमरकर सचिव डॉ.सुनील गोरीवले सहसचिव सुचिता पवार खजिनदार , तानाजी भुवड, कार्यकारी सदस्य राजेंद्र बोथरे, नंदकिशोर भागवत, चंद्रकांत शिगवण, सुलतान आराई, वर्षा शिर्के, संतोष पेंढारी सारंगच्या सरपंच सुषमा जोशी ताडील चे सरपंच शंकर खापरे ,कळंबटच्या सरपंच साक्षी महाडिक ,
बांधतिवरे सरपंच दत्ताराम साळवी अंगणवाडी सेविका गीता महाजन पंचक्रोशीतील सर्व वाड्यांचे वाडी अध्यक्ष व महिला मंडळाच्या अध्यक्षा तसेच शाळेचे मुख्याध्यापक संतोष हजारे सहाय्यक, शिक्षक सुहास धाडवे, सरोज पैठणे, शशिकांत मेंगाणे लिपिक राजेश पवार, शिपाई सुधीर शिगवण व स्वप्नील जाधव तसेच विद्यालयातील सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी कार्यक्रमासाठी उपस्थित होते

