दापोली प्रतिनिधी
प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण शाळेला नेहमीच सहकार्य करणारे शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य ( शिक्षण तज्ञ) सुनील देवजी फिलसे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध स्पर्धांमधून यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. बाल सभा घेण्यात आली. सदर बाल सभेत उपस्थित अध्यक्ष किसन पांदे, सरपंच दिनेश आडविलकर, उपाध्यक्ष अजित पाते, शिक्षण तज्ञ सुनील फिलसे, ग्रामपंचायत सदस्या भक्ती फिलसे, सर्व मंडळांचे अध्यक्ष, पालक, अंगणवाडी सेविका व विद्यार्थी यांचे मुख्याध्यापक दिनेश कानू चिपटे यांनी गुलाबपुष्प देवून स्वागत केले.
मुख्याध्यापक दिनेश चिपटे यांनी शाळेची यशोगाथा अर्थात आत्तापर्यंत झालेली शाळेची सर्वांगीण प्रगती सादर केली. यामध्ये प्रामुख्याने विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा, NMMS परीक्षा, इतर बाह्य परीक्षा यामध्ये चमकले असून मिळालेल्या शिष्यवृत्तीचा लाभ घेत आहेत. तसेच इस्रो-नासा यामध्ये सलग तीन वर्षे विद्यार्थी भेट देण्यासाठी पात्र ठरले आहेत. रत्नागिरी जिल्हा परिषदेचा आदर्श शाळा पुरस्कार मिळाला असून सलग दोन वर्षे “मुख्यमंत्री माझी, शाळा सुंदर शाळा अभियानात” अनुक्रमे दापोली तालुक्यात दुसरा व रत्नागिरी जिल्ह्यात दुसरा क्रमांक प्राप्त झाला आहे. केंद्र स्तर, प्रभाग स्तर, तालुका स्तर व जिल्हा स्तरावर शाळेतील जास्तीत जास्त विद्यार्थी खो-खो, कबड्डी, लंगडी, लांब उडी, धावणे, उंच उडी यामध्ये चमकले आहेत. यावर्षी जिल्हास्तरावर मयंक अनिल तेलप याचा लांब उडी मध्ये दुसरा क्रमांक आला आहे. VDS-4 या परीक्षेत दापोली तालुक्यात ३ विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले आहेत, शोध कला रत्नांचा तसेच शासनाच्या विविध उपक्रमात आपली मळे शाळा उच्चतम पातळीवर असल्याचे सांगितले.
शालेय सर्व विद्यार्थ्यांना कंपास पेटी व अंगणवाडीतील सर्व विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक पाटी व पेन्सिल बाॅक्स तसेच शोध कलात्नांचा अंतर्गत चित्रकला साहित्य वाटप मळे गावचे ग्रामस्थ व सध्या पंजाब येथे वास्तव्यास असलेले शेखर देवजी फिलसे यांच्या वतीने त्यांचे बंधू सुनील देवजी फिलसे व शशीकांत देवजी फिलसे यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.
VDS4 परीक्षेत गुणवत्ता यादीत आलेल्या मयंक अनिल तेलप, कल्पक किसन पांदे व शर्वरी प्रशांत पांदे व इस्रो-नासा भेटीसाठी पात्र ठरलेल्या मानिनी मंगेश आग्रे, मंथन मंगेश आग्रे, आयुष मुकेश पांदे तसेच शालेय विविध स्पर्धेत विजयी विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन A4 साईज दोन वह्या व पेन दानशूर व्यक्तीमत्व असलेले व शाळेला नेहमीच मदत करणारे खांडेकर सर यांच्या वतीने संतोष सखाराम फिलसे यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. जिल्हास्तरीय खेळणारे सोळा विद्यार्थ्यांना १६ स्कूल बॅगा कोकण ट्रेलचे डायरेक्टर अतुल जेठमलानी व त्यांचे सहकारी यांच्या वतीने त्यांच्याच हस्ते वितरित करण्यात आल्या.शाळेच्या सर्वांगीण प्रगतीमुळे सर्व शिक्षकांना प्रत्येकी एक घड्याळ, शाळ, श्रीफळ ग्रामस्थ शेखर फिलसे यांच्या वतीने त्यांचे बंधू सुनील देवजी फिलसे व सरपंच दिनेश आडविलकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. सरपंच दिनेश आडविलकर व बाल सभेचे अध्यक्ष किसन पांदे यांनी विद्यार्थ्यांना व पालकांना, ग्रामस्थांना शुभेच्छा दिल्या. शेवटी सर्वांचे आभार जेष्ठ शिक्षक प्रकाश पाते यांनी मानले व कार्यक्रमाची सांगत झाली
