दापोली प्रतिनिधी
योग प्राणायाम दररोज करण्याची सवय व्हावी त्याची माहिती व्हावी तू कशाप्रकारे करायचा याची शास्त्रोक्त माहिती मिळावी यासाठी दापोली शहराजवळ असलेल्या जालगाव ग्रामपंचायत येथे नि:शुल्क योग शिबिराचा मोठा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. एक डिसेंबर ते 8 डिसेंबर या कालावधीत हा निशुल्क सेवा उपक्रम राबवला जाणार आहे.जालगाव येथील योग शिबिर तज्ञ विश्वास फाटक यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम होणार आहे. दररोज आठ दिवस पहाटे 5:45 ते सकाळी सात या वेळेत हा उपक्रम घेतला जाणार आहे.
जलस्वराज्य ग्रामपंचायत जालगाव येथे, दिनांक 1 डिसेंबर 2024 रोजी योग, प्राणायाम, ध्यान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे तरी सर्व योग प्रेमींनी या शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. असं आवाहन करण्यात आले आहे. यासाठी पुढील क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे मुख्य योग शिक्षक –
श्री .शैलेश आठले फोन. no- 9421143696
सहाय्यक योग शिक्षक – सौ. नंदा साळूंके 7709309028, सौ. सविता मोरे 7588047921
सौ. मानसी साळुंके 7798540251 अधिक माहितीसाठी संपर्क विश्वास फाटक(योग गुरु)
मोबाईल क्रमांक संपर्क – 9096653672 असा आवाहन करण्यात आला आहे तसेच यावेळी शिबिराला येताना सतरंजी घेऊन या शिबिरासाठी सहभागी व्हावे अशी सूचना करण्यात आली आहे.
