राष्ट्रपती पदक जाहीर झाल्याबद्दल प्रजासत्ताक दिनी झाला विशेष गौरव
*नवी मुंबई*
राष्ट्रपती पदक जाहीर झालेले कोकण परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांचा कोकण विभागीय आयुक्त (आयएएस अधिकारी) डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनाच्यादिवशी विशेष गौरव करण्यात आला आहे. आजवर अनेक गुन्हेगारांना अद्दल घडवणारे भारतीय प्रशासकीय पोलीस सेवेतील अधिकारी संजय दराडे यांच्या आजवरच्या कामाची दखल घेऊन त्यांना केंद्र शासनाकडून राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले आहे. लवकरच हा सन्मान सोहळा होणार आहे. 2005 सालचे भारतीय पोलीस सेवेतील आयपीएस अधिकारी असलेले संजय दराडे हे मूळचे नाशिक येथील आहेत.
कोकणात धडाकेबाज कारवाई करणाऱ्या महानिरीक्षक संजय दराडे यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाल्यावर त्यांचे विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन करण्यात येत आहे. मेकॅनिकल इंजिनियर ते आयपीएस अधिकारी अशी जिद्द बाळगून भारतीय पोलीस प्रशासकीय सेवेत आल्यानंतर या अधिकाऱ्याने आपल्या कार्यकर्तुत्वाचा ठसा आपल्या कामातही उमटवला आहे. कोकणपरिक्षेत्रात ठाणे ग्रामीण, रत्नागिरी,रायगड सिंधुदुर्ग व पालघर हे पाच जिल्हे येतात.
कोकणात गेल्या एक वर्षात धडाकेबाज कामगिरी करणाऱ्या कोकण परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांना राष्ट्रवादी पदक जाहीर झाल आहे. 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी हा सन्मानपूर्वक सोहळा होणार आहे. कोकण परिक्षेत्रात गेल्या दोन वर्षात अनेक खुनासारखे गुन्हे,महिलांवरील अत्याचार या सगळ्या प्रकरणात तातडीने कारवाई करण्याचे निर्देश पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांनी सूत्र हाती घेतल्या नंतर दिले होते. इतकच नाही तर गेल्या वर्षात लोकसभा व विधानसभा निवडणुकाही त्यांच्याच कार्यकाळात कायदा सुव्यवस्था त्यावर पूर्णपणे नियंत्रण ठेवून निवडणुका यशस्वीपणे पार पडल्या. कोकणात आणि ठिकाणी संवेदनशील परिस्थिती असतानाही संजय दराडे यांनी चौक पोलीस बंदोबस्त व प्रतिबंधात्मक कारवाई करत या सगळ्याचे नियोजन केलं. भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी असलेले कोकणचे परिक्षेत्राचे महानिरीक्षक संजय दराडे त्यांच्या या सगळ्या कामाची दखल केंद्र शासनाकडून घेण्यात आली आहे.
संजय दराडे यांनी कोकण विभागाचे सूत्र हाती घेतल्यानंतर कोकणातील प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक पोलीस ठाण्यात जाऊन त्यांनी स्वतः भेटी दिल्या होत्या. त्यानंतर कायदा सुव्यवस्थेसंब योग्य ते मार्गदर्शन केलं होतं. विशेषतः महिलांवरील अत्याचार महिलांबाबत असलेल्या तक्रारी याबाबत 24 तासाच्या आत संबंधित गुन्हेगारावरती कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले होते. त्यानुसार अनेक ठिकाणी कारवाई सुरू करण्यात आली आहे. इतकच नाही तर रायगड व रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात अनेक काही हत्या प्रकरण घडली आहे तो यामध्ये विशेषतः रत्नागिरी व रायगड जिल्ह्याचा समावेश आहे. या बहुतांश हत्या प्रकरणातही संबंधित आरोपीला निष्पन्न करून कारवाई करण्यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांनी मोठी भूमिका बजावली आहे. कोणत्याही दबावाला बळी न पडता धडाकेबाज कारवाई ही त्यांची विशेष कामगिरी ठरली आहे.
इतकच नाही तर नाशिक जिल्ह्याचे ते जिल्हा पोलीस अधीक्षक असताना त्यांनी उत्तर प्रदेशातून येणाऱ्या बंदुकी सारखा अवैधरित्या शस्त्रसाठा जप्त करून तब्बल 45 बंधू गाव व तीन हजार काडतुसे पकडून मोठी आठ जणांची आंतरराज्य टोळी त्यांनी जेरबंद केली होती. हे अत्यंत संवेदनशील मोठी धडाकेबाज कारवाई केली होती. ही कारवाई 2017 च्या दरम्यान नाशिकचे तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी केली होती. उत्तर प्रदेशातून येणारा महाराष्ट्रात मुंबई परिसरात आणण्यात येत असताना पकडण्यात आलेला हा अवैध बंदुकीचा साठा व व आठ जणांची आंतरराज्य टोळी ही कारवाई त्या वेळेला अवघ्या महाराष्ट्रात मोठी चर्चेची ठरली होती. नाशिकमध्ये केलेल्या या मोठ्या कामगिरीबद्दल त्यांचा तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडूनही पत्र देऊन गौरव करण्यात आला होता. त्यांच्या या सगळ्या आजवरच्या कामाची दखल घेण्यात आली आहे.
आता लवकरच कोकण परीक्षेत राज जिल्हा पोलीस ठाण्यात अद्यावत सोशल लॅब सुरू करण्यासाठी त्यांनी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत लवकरच या सोशल सायबर क्राईमच्या विरोधात सोशल लॅब ऍक्टिव्ह होणार आहेत.
2005 सालचे भारतीय पोलीस सेवेतील आयपीएस अधिकारी असलेले संजय दराडे हे मूळचे नाशिक येथील आहेत. प्रतिकूल परिस्थितीतून जिद्द बाळगत त्यांनी प्रशासकीय सेवेत यश मिळवले. संजय दराडे पुणे इंजिनिअरिंग कॉलेजमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंग विषयातील त्यांनी शिक्षण पूर्ण केला आहे त्यानंतर त्यांची भारतीय प्रशासकीय सेवेत निवड झाली होती.

