दापोली प्रतिनिधी
दापोली तालुक्यातील सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूल, करंजाणी येथे दोन दिवशी क्रीडा महोत्सव पार पडला. क्रीडा स्पर्धाचे उद्घाटन दापोलीचे प्रांत अधिकारी डॉ.अजित प्रकाश थोरबोले यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमसाठी प्रमुख पाहुणे म्हणून संतोषभाई मेहता फाउंडेशनचे अध्यक्ष सुजय मेहता सर, गटशिक्षणाधिकारी अण्णासाहेब बळवंतराव, पिसई केंद्र प्रमुख उदय गांधी, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. रितू मेहता मॅडम, शाळेचे क्रीडा शिक्षक सुहास नलावडे इतर शिक्षक व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
यावेळी मुग्धा चव्हाण, वेदश्री भांबुरे यांनी लाठी-काठी प्रदर्शन केले. सार्थक नागरगोजे आणि अहान अमृते यांनी स्केटिंगचें प्रदर्शन केले आणि सर्व वर्गाच्या विद्यार्थ्यांनी एनसीसी परेड सादर करण्यात आले. शाळेमध्ये अनेक खेळाडू निर्माण व्हावेत म्हणून त्यांना प्रोत्साहन करण्यासाठी डॉ.अजित थोरबोले यांनी मुलांसोबत व्हॉलीबॉल या खेळाचा आनंद घेतला.
तसेच कबड्डी, व्हॉलीबॉल, लंगडी, टग ऑफ वार, फुटबॉल, डॉजबॉल, क्रिकेट, गोळाफेक आणि धावणे व इतर लहान मुलांचे मनोरंजन खेळांचे खेळ अशा विविध क्रीडा प्रकारांचे आयोजन करण्यात आले होते.

