दापोली प्रतिनिधी
कोळथरे येथील कै.कृष्णामामा महाजन स्मृतिप्रतिष्ठान मार्फत नुकतेच पंचनदी गावामध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन पंचनदी ग्रामपंचायत सरपंच सौ.संकल्पना शिंदे , उपसरपंच अमित नाचरे , प्रतिष्ठानचे कौस्तुभ दाबके आणि मान्यवर डॉक्टर्सच्या हस्ते पार पडले.
पंचनदीच्या विविध वाड्यांमधील महिला, ज्येष्ठ नागरीक, तरुणी इ. घटकांना डोळ्यासमोर ठेवून या शिबिराचे आयोजन केले गेल्याचे उपाध्यक्ष मिहिर महाजन म्हंटले.
या शिबिरात नेत्र तपासणी, डायबिटीस, ब्लड प्रेशर , जनरल चेकअप आणी विशेषत्वाने सर्व महिलांसाठी मोफत हिमोग्लोबिन आणी CBC तपासणी याचा समावेश होता. नेत्र चिकित्सक डॉ.प्रणेश मोघे, प्रसिद्ध डॉ.निखिल पावसे, डॉ.राठोड यांच्यासह दापोली होमिओपॅथिक कॉलेजचे प्रशिक्षणार्थी डॉक्टर्स, डॉ.रविकांत पवार व टीम देखील सहभागी झाले होते.
CBC आणी हिमोग्लोबीन तपासणी साठी अमेय लॅब चे श्री.बिपीन मयेकर यांनी मोलाचे सहकार्य केले.
हे शिबिर पंचनदीचे ग्रामपंचायत कार्यालयाचे परिसरात आयोजित करण्यात आले होते. गावातील नागरिकांनी याचा लाभ घेतला तसेच भविष्यातील काही ऑपरेशन, ट्रिटमेंट्स याची देखील व्यवस्था करण्यात आली.

