ज्ञानदीप विद्यामंदिर दापोली प्रशाळेत वार्षिक स्नेहसंमेलन अंतर्गत बक्षीस वितरण सोहळा संपन्न.
दापोली प्रतिनिधी
ज्ञानदीप विद्यामंदिर दापोली माध्यमिक शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन अंतर्गत बक्षीस वितरण समारंभ व दहावीतील विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ राधाकृष्ण मंदिर दापोली येथे उत्साहात संपन्न झाला.
बक्षीस वितरण समारंभाचे उद्घाटन ज्ञानदीप विद्यामंदिर दापोलीचे सेक्रेटरी सुजय मेहता यांचे हस्ते झाले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून गिम्हवणे केंद्राचे केंद्रप्रमुख सुनील कारखेले व भूपेंद्र तलाठी होते. तसेच शाळा व्यवस्थापन समिती, शाळा शिक्षक पालक संघ, माता पालक संघ प्रतिनिधी, प्रशालेचे मुख्याध्यापक मधुकर मोरे हे उपस्थित होते.
या बक्षीस समारंभामध्ये वार्षिक स्नेहसंमेलन 2024-25 अंतर्गत वर्षभरात संपन्न झालेल्या मराठी, हिंदी, इंग्रजी विषयांतर्गत झालेल्या निबंध व वक्तृत्व स्पर्धा संस्कृत श्लोक पाठांतर, हिंदी एकांकिका, पाककला स्पर्धामधील यशस्वी विद्यार्थी व वार्षिक क्रीडा स्पर्धा मधील वैयक्तिक व सांघिक स्पर्धामध्ये प्राविण्य प्राप्त खेळाडूंचा गौरव करण्यात आला. सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून स्नेहा भाटकर व रुद्र बांद्रे याना गौरविण्यात आले. याप्रसंगी बोलताना प्रमुख पाहुणे केंद्रप्रमुख सुनील कारखेले यांनी “विद्यार्थ्यांनी शालेय गुणवत्तेबरोबर विविध छंद जोपासले तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो. असे मत मांडले व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सेक्रेटरी सुजय मेहता यांनी “विद्यार्थ्यांनी अध्ययना बरोबरच विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन यश प्राप्त करावे.” असे सांगून सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका जान्हवी जगताप यांनी तर प्रास्ताविक व आभार शिक्षक प्रतिनिधी विकास पाटील यांनी केले. त्याच अनुषंगाने दुपार सत्रामध्ये इयत्ता 10 वी विद्यार्थी शुभेच्छा समारंभ पार पडला. या कार्यक्रमासाठी ज्ञानदीप संस्था अध्यक्षा सरोजताई मेहता मेहता संस्था सेक्रेटरी सुजय मेहता व प्रमुख पाहुणे म्हणून माजी केंद्रप्रमुख प्रवीण काटकर शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्षा पूर्वा सकपाळ शाळा व्यवस्थापन समिती सदस्या सौ.धाडवे, सौ.राऊत, सौ.करजीवकर उपस्थित होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी शाळेबद्दलच्या आपल्या भावना मनोगतातून व्यक्त केल्या. पूर्वा सपकाळ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पाहुणे प्रवीण काटकर यांनी “विद्यार्थ्यांना आपले शालेय जीवन व आपल्या जीवनातील आठवणी सांगून जीवनातील भावी आयुष्याकरिता मार्गदर्शन व SSC 25 चे परीक्षा करिता शुभेच्छा दिल्या.” तसेच सरोजताई मेहता यांनी भावी आयुष्यासाठी येणाऱ्या आव्हानाबद्दलची माहिती व दहावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
