खेड –
दिनांक – 03 डिसेंबर 2024.
रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूल खेड मार्फत दहावी नंतर इंजिनिअरींग, आर्किटेक्चर, मेडिकल, सी. ए, सी. एस, लाॅ साठी जाण्यास इच्छुक विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी रविवार दिनांक 8 डिसेंबर 2024 रोजी दापोली येथे सकाळी ठीक 10 वाजता तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून मोफत मार्गदर्शनपर सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे.रोटरी स्कूल तर्फे दहावीच्या विद्यार्थी व पालकांसाठी दापोली येथे मोफत मार्गदर्शनपर सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. मार्गदर्शनासाठी राजस्थान, कोटा येथील तज्ज्ञ व्याख्यात्यांची खास उपस्थिती असणार आहे.
इयत्ता दहावी नंतर सायन्स, काॅमर्स, आर्टस् यापैकी कोणती शाखा निवडावी ? यामध्येही JEE व NEET यांसारख्या वैद्यकीय, इंजिनिअरींग, आर्किटेक्चर, सी.ए., सी.एस व लाॅ अशा अनेक शाखांची नावे वाचून पालक व विद्यार्थी दोघेही पार गोंधळून जातात. IIT, NIT यांसारख्या नामांकित संस्थांमध्ये प्रवेश मिळवायचा असेल तर दहावी परीक्षेनंतर लगेचच अकरावीचा अभ्यास चालू करणे महत्वाचे ठरते. हा विचार करताना पालकांना आपल्या पाल्याच्या भविष्यविषयक विवंचना सतावत असतात. इयत्ता दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर सर्वच विद्यार्थीना पुणे – मुंबईसारख्या शहरात जाऊन नामांकित कोचिंगमध्ये प्रवेश मिळविणे शक्य होत नाही. त्यामुळे रत्नागिरी व रायगड जिल्ह्यातील गुणवंत व होतकरू विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता असूनही प्रवेश परीक्षांमध्ये अपेक्षित यश मिळत नाही. याचे प्रमुख कारण म्हणजे योग्य मार्गदर्शनाचा अभाव अशा विद्यार्थ्यांच्या उद्दिष्टपूर्तीसाठी सदर सेमिनार फारच लाभदायी ठरणार आहे.
सदर सेमिनार रविवार दिनांक 8 डिसेंबर 2024 रोजी दापोली तालुक्यामध्ये पद्मश्रद्धा हाॅल, नर्सरी रोड, आमदार निवासाच्या बाजूला, दापोली येथे सकाळी 10.00 वाजता संपन्न होणार असून मार्गदर्शनासाठी राजस्थान, कोटा येथील तज्ज्ञ व्याख्यात्यांची खास उपस्थिती असणार आहे.
सदरच्या दापोली येथील सेमिनारमध्ये इयत्ता बारावीनंतर इंजिनीयरींगच्या विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या JEE या प्रवेश परीक्षेची तयारी इयत्ता 10 वी नंतर कशी करावी ? MHT CET व आर्किटेक्चर परीक्षा तयारी या संदर्भात सखोल मार्गदर्शन तज्ज्ञ प्राध्यापक प्रा. जतीन गुप्ता सर करणार आहेत. तसेच मेडिकल क्षेत्रात आवड व करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी इयत्ता अकरावीपासूनच NEET परीक्षा तयारी व अभ्यास नियोजन कसे करावे ? यांसारख्या विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या मनातील प्रश्नांबाबत सखोल मार्गदर्शन प्रा. पुरूषोत्तम कुमार सर करणार आहेत. तसेच ज्या विद्यार्थ्यांना वाणिज्य शाखेमध्ये करिअर करायचे आहे अशा विद्यार्थ्यांसाठी C.A Foundation, CSEET, CLAT यांसारख्या प्रवेश परीक्षांसदर्भात प्रा. धनुजा धूत यांचे बहुमोल असे मार्गदर्शन लाभणार आहे.
दापोली अधिक माहितीसाठी संपर्क –
रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूल, खेड . 7843036902, 8208971189.
इच्छुक विद्यार्थी तसेच त्यांचे पालक यांनी आपला अनमोल वेळ वाया न घालवता त्वरीत या मोफत सेमिनारचा लाभ घ्यावा. असे आवाहन रोटरी स्कूलचे चेअरमन मा. श्री. बिपीनदादा पाटणे यांनी केले आहे.
