आगरवायंगणी:
३ डिसेंबर दापोली तालुक्यातील मुरुड येथील न.का.वराडकर हायस्कूलचे शिक्षक प्रमोद प्रभाकर गमरे यांना २०२४ चा वसंत स्मृती पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.भारतीय जनता पार्टी शिक्षक आघाडी कोकण विभागामार्फत वसंत स्मृती पुरस्कार हा व्रतस्थ भावनेने अध्यापन कार्य हीच पुजा समजून, सामाजिक ऋणांची परतफेड करण्याच्या भूमिकेतून आरंभीलेल्या आपल्या शैक्षणिक कार्याचा आलेख सतत उंचावत ठेवणारे आदर्श शिक्षक प्रमोद प्रभाकर गमरे यांना २०२४ चा वसंत स्मृती पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
या पुरस्कारानंतर त्यांचे न.का.वराडकर हायस्कूलच्या मुख्याध्यापिका मधुमालती गारडे, संस्था विश्वस्त साठले गुरूजी, शालेय समिती अध्यक्ष संजय भावे, संस्था सचिव विराज खोत, संस्था सदस्य मनोज बादल, मनोज पवार, नियमक मंडळ अध्यक्ष वैभव वराडकर, प्रेरणा भोसले, सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारीवर्ग यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी कोकण पदवीधर मतदारसंघातील आमदार निरंजन डावखरे, कोकण विभागीय आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार संजय केळकर, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूरचे कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे हे उपस्थित होते.
