आगरवायंगणी: ०३ डिसेंबर
रत्नागिरी जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाची सर्वसाधारण सभा मुख्याध्यापक भवन खेडशी येथे संपन्न झाली. सदर सभेत दापोली तालुक्यातील नॅशनल हायस्कूल व ज्युनियर कॉलेज दापोलीचे मुख्याध्यापक आयुब कासिम मुल्ला यांची जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी सर्वानुमते (बिनविरोध) निवड करण्यात आली.मुख्याध्यापक आयुब मुल्ला यांची जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी सर्वानुमते निवड झाल्याबद्दल दापोली तालुका माध्यमिक अध्यापक संघाकडून मुख्याध्यापक आयुब कासिम मुल्ला यांचे अभिनंदन करण्यात आले.
या कार्यक्रमास दापोली मुख्याध्यापक राज्य संघाचे कोषाध्यक्ष संदेश राऊत, तालुका माध्यमिक अध्यापक संघाचे अध्यक्ष दिपक पवार, कार्याध्यक्ष सत्यवान दळवी, सचिव चंद्रकांत मोरे, जिल्हा प्रतिनिधी संदिप क्षिरसागर, माजी संचालक गिरीश पाटील, रत्नागिरी जिल्हा पतपेढी उपाध्यक्ष व संचालक किशोर नागरगोजे, तज्ज्ञ संचालक व मुख्याध्यापक आकाराम महिंद, तज्ज्ञ संचालक व मुख्याध्यापक संतोष हजारे, संचालक बिपिन मोहिते, मुख्याध्यापक संभाजी कोंडीकिरे, मुख्याध्यापक पांडुरंग ढेरे, क्रीडाशिक्षक अविनाश पाटील, आशुतोष साळुंखे, पोपट खाडे, रामदास पाटील, बाळासाहेब मिसाळ, धनावडे, माजी मुख्याध्यापक सुनील देसाई, प्रमोद गमरे असे अनेक मान्यवर उपस्थित होते. माजी संचालक गिरीश पाटील यांनी जिल्ह्य़ातील निवडीबद्दल सर्व माहिती उपस्थित मान्यवरांना कथन केली. कार्यक्रमात तज्ज्ञ संचालक व मुख्याध्यापक आकाराम महिंद यांनी आपल्या मनोगतात- मुख्याध्यापक आयुब मुल्ला यांच्या निवडीबद्दल “दापोली तालुक्यासाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे.” असे गौरवोद्गार काढले. आयुब मुल्ला यांच्या या निवडीबद्दल त्यांचे दापोली तालुका लोकशाहीत संघाच्या प्रत्येक सभासदांमध्ये समाधान दिसत होते.
