प्रकटदिन सोहळ्यानिमित्त 20 फेब्रुवारी विविध कार्यक्रम
दापोली प्रतिनिधी
दापोली शहराजवळील गिम्हवणे यथे सालाबाद प्रमाणे श्री गजानन महाराज प्रकटदिनन सोहळा गुरुवार दिनांक 20 फेब्रुवारी 2025 रोजी होणार आहे. भाविकांनी या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहून श्रींचे दर्शनाचा लाभ घ्यावा या निमित्याने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 5 दिवसाच्या कालावधीत श्रींचे मूर्तीवर नारळ पाणी, उसाचा रस, दूध यांचा अभिषेक सलग 3 दिवस होतो मंत्रजागरात संप्पन्न होतो दिनांक 18.2.25 रोजी सत्य गजानन पूजेचे आयोजन केले आहे दुपारी 3 ते 4 वेळेत पोवाडा व 4 ते 5 या वेळेत विविध स्पर्धा विदयार्थ्यां साठी घेतल्या जातात त्याचे बक्षीस वितरण सायंकाळी 4 ते 5.30 या वेळेत होईल 19. 2.25 सकाळी काकड आरती, अक्षता अभिषेक नंतर गजानन विजय ग्रंथाचे पारायण, रोज नामांकित भजनी मंडळाची भजने 19 तारखेला दुपारी 4 ते 6 या वेळेत प्रवचन दिनांक 20.2.25 रोजी सकाळी 5.30 ला काकड आरती अभिषेक व लघुरुद्र,पालखी पादुका प्राणप्रतिष्ठापना 10 ते 12.30 प्रकट दिन कीर्तन व पुष्प वृष्टी त्या नंतर दर्शन व झुणका भाकरी प्रसाद वाटप, संगीत सेवा, वारकरी संगीत सेवा सायंकाळी 5 ते 7 श्रींची भव्य रथातून पालखी मिरवणूक दापोली राधाकृष्ण मंदिरापासून पुन्हा परत ही मिरवणूक मंदिरात येते मंदिरात आल्यावर भक्त गण पालखी चे भव्य स्वागत करतात पालखी नाचवली जाते गजानन महाराज कि जय जा जय घोषाने मंदिर परिसर दाणानून जातो सुवासिनी पालखी मंदिराच्या दारात येताच महाराजांना ओवाळून पालखी आत यते गजानना गजानना स्वामी समर्थ गजानना च्या गजारात सर्व महिला पुरुष, वारकरी बेभान होऊन नाचतात नंतर हरिपाठ होऊन आरती होते व या भव्य दिव्य सोहळ्याची सांगता होते हजारो भावी संपुर्ण दापोली तालुक्यातून या उत्सवास येतात तालुक्यातील एक मोठा शिस्तबद्ध, नियोजित उत्सव म्हणून या प्रकट दिन उत्सवाकडे पहिले जाते गजानन महाराज भक्त मंडळाचे पदाधिकारी सदस्य भक्त गण यांची हा उत्सव जास्तीजास्त कसा उत्तम होईल यासाठी जवळ जवळ 2 महिन्या पासून तयारीत असतात शालेयविदयार्थ्यांसाठी विविध स्पर्धा 1 महिना आधी घेतल्या जाता 35 ते 40 प्राथमिक व माध्यमिक शाळा या स्पर्धेत सहभागी होतात, अतिशय उत्सहात, जल्लोषात , भक्तिमय वातावरणात गजानन महाराज प्रकट दिन साजरा होतो हजारो भक्तगण या उत्सवाला श्रींचे दर्शनाला प्रचंड गर्दी करताना दिसून येतात सर्व भक्ताचं उत्तम सहकार्य या उत्सवाला मिळत, सर्व भक्त गणांनी या वर्षी ही प्रकट दिन उत्सवाला उपस्थित राहून कार्क्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन गजानन महाराज भक्त मंडळाकडून करण्यात आले आहे
