दापोली तालुका टेनिस बाॅल क्रिकेट असोसिएशनचा पुढाकार
दापोली प्रतिनिधी
दापोली तालुका टेनिस बाॅल क्रिकेट असोसिएशन चे अध्यक्ष जतीन साळगावकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी दापोली आझाद मैदान स्वच्छता अभियान राबविण्यासाठी जे समस्त दापोलीकराना आवाहन केले होते या आवाहनाला उत्तम प्रतिसाद देत विविध मंडळांचे सदस्य, व्यावसायिक व क्रिकेट खेळाडू उपस्थित होते. या सगळ्यांनी मिळून दापोली येथील भव्य असलेल्या आझाद मैदान परिसराची स्वच्छता केली. दापोली येथील आझाद मैदान हे रत्नागिरी जिल्ह्यातील सगळ्यात मोठे असलेले मैदान आहे. अनेक ऐतिहासिक सभा व घडामोडींचे हे मैदान साक्षीदार असून अनेक खेळाडू याच मैदानाने घडविले आहेत.
रविवारी सकाळी आठ वाजता स्वच्छता मोहीम सुरू झाली.बघता बघता मैदानावरील कचरा, रिकाम्या बाॅटल यांनी नगरपंचायत ची कचरा गाडी भरली . मैदानावरील चोर वाटा बंद करुन मैदानातून शार्ट कट नी जाणार्या वाहनाना प्रतिबंध करण्यासाठी प्रयत्न केले गेले.
दिडशेच्या वर उपस्थिती होती.
मैदानावर प्रेक्षकांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली.
या प्रसंगी दापोली क्रीडा मंडळाचे अध्यक्ष राजूशेट घोसाळकर बैठक गृप चे शेखर आग्रे,मया शिंदे,साई देसाई,बावा पवार फराज,समीर झगडे , रविकांत जाधव स्वप्नील शिंदे अमित बिंद,सचिन महाडीक जेष्ठ नागरिक निसार परकार,काटकर सर,लेदर बाॅल क्रिकेट असोसिएशन चे संदीप बर्वे सर,राम जागडे सर, कादिर तरे सर तसेच सत्तार रखांगे,समद चिकटे,आसिफ चिकटे, अनिकेत वालावलकर,तुफेल ऐनरकर, सैफशेट पठाण,परागशेट केळसकर,विलास मोरे,शैलेश जालगावकर, अमित इंदुलकर,अॅड. योगेश दांडेकर, संदिप अमृते, डाॅ.शिंदे,अनुप देशमुख, ओंकार दळवी, परेश मोहिते, जयदीप पालकर, किशोर गुंदेकर, कौस्तुभ वंडकर, अभि शेडगे, राहूल राठोड, नगरपंचायत चे अधिकारी अमित रेमजे व अनेक खेळाडू उपस्थित होते. नगर पंचायत दापोली चे विषेश सहकार्य मिळाले.
तसेच राहुल राठोड व त्यांच्या सहकाऱ्यांनी दोन जेसीबी कामाला देउन बहूमोल असे सहकार्य केले.
दापोली क्रिकेट असोसिएशन तर्फे मैदानावर मैदान स्वच्छ ठेवण्यासाठी सुचना फलक लावले गेले आहेत.
दापोली क्रिकेट असोसिएशन चे अध्यक्ष जतीन साळगावकर व पदाधिकारी यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.
दापोली तालुका टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष जतिन साळगावकर उपाध्यक्ष अनिकेत वालावलकर व जयदीप पालकर सचिव राम जागडे खजिनदार प्रवीण काटकर सर सल्लागार (adv) योगेश दांडेकर, प्रसाद शिर्के स्वप्नील शिंदे सेफ पठाण तुफेल ऐनारकर डॉक्टर शिंदे अनुप देशमुख किशोर गुणदेकर समीर झगडे असे सर्व सभासद उपस्थित होते अशी माहिती अध्यक्ष जतिन साळगावकर यांनी दिली
