दापोली प्रतिनिधी
स्नेहदीप दापोली संचालित इंदिराबाई वामन वडे कर्णवधिर विद्यालय दापोली येथे जागतिक दिव्यांग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कर्णवधिर मुलांच्या कला गुणांना चालना मिळावी व त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण व्हावा यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी इंदिरावाई वामन वडे कर्णवधिर विद्यालयाचे अध्यक्ष डॉ. दीपक हर्डिकर कार्यकमाचे अध्यक्ष म्हणून लाभले होते. प्रमुख पाहुण्या म्हणुन डॉ. राधिका माणकापुरे लाभल्या होत्या तर स्नेहदीप दापोली संस्थेच्या संचालिका श्रीमती मंगल प्रकाश सणस व डॉ. नेहा अतुल मेहता , विद्यालयाचे मुख्याध्यापक मनोहर जालगांवकर व इतर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, विद्यार्थी हजर होते.
दीपप्रज्वलन करून कार्यकमाची सुरूवात झाली उपस्थित मान्यवरांचे स्वागत विद्यालयाच्या विशेष शिक्षिका संपदा अनंत वडवे वाई यांनी केले विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री मनोहर जालगांवकर सर यांनी प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय करून दिला. यानंतर मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते कर्णवधिर विद्यार्थ्यांना वक्षीस वितरीत करण्यात आली.
यावेळी विद्यालयाचे वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता संजय वलाढये यांनी दिव्यांगांसाठी असलेल्या शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली तर कार्यकमाच्या प्रमुख पाहुण्या मा. डॉ. सौ. राधिका माणकापुरे यांनी दिव्यांग मुल जन्माला येवू नयेत म्हणून पालकांनी कोणती काळजी घ्यावी व दिव्यांग मुल जन्माला आल्यावर पालकांनी काय केले पाहिजे या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले स्नेहदीप दापोली संस्थेच्या संचालिका श्रीमती मंगल प्रकाश सणस यांनी अशी कर्णवधिर मुल नात्यात, ओळखीत, माहितीमध्ये असतील तर त्यांना या शाळेत प्रवेश घेण्यावावत प्रोत्साहीत करा असे अवाहन पालकांना केले व कार्यकमास शुभेच्छा दिल्या आपल्या अध्यक्षीय भाषणात मा. डॉ. श्री. दीपक हार्डिकर सर्वांनी केलेल्या मार्गदर्शनाचा आढावा घेतला. विद्यालयात नव नवीन उपकभ संस्था राववत आहे. दिव्यांगांच्या कला गुणांना वाव दिला पाहिजे. मुलांच्या आवडी निवडी काय आहेत ते ओळखून कार्य केले पाहिजे. आपले दिव्यांग मुल स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजेत. या मुलांच्या मध्ये खूप क्षमता आहेत. त्या क्षमता ओळखून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात कशी येतील यासाठी पालकांनी व इतरांनी सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत. यासाठी संस्था आपल्या सोवत असल्याचे सांगितले. शेवटी जागतिक दिव्यांग दिनानिमित्त सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी इंदिराबाई वामन वडे कर्णवधिर विद्यालयाचे अध्यक्ष डॉ. दीपक पर्शराम हर्डिकर , डॉ. सौ. राधिका माणकापुरे, स्नेहदीप दापोली संस्थेच्या संचालिका मंगल प्रकाश सणस, डॉ. सौ. नेहा अतुल मेहता , विद्यालयाचे मुख्याध्यापक मनोहर जालगांवकर व इतर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, विद्यार्थी, आवर्जुन हजर होते. या संपूर्ण कार्यकमाचे सूत्रसंचालन व आभार विद्यालयाचे विशेष शिक्षक चंडू मनाजी कौटे यांनी मानले.
