दापोली येथील ज्ञानदीप माध्यमिक विद्यामंदिर मध्ये मराठी भाषा संवर्धन सप्ताहनिमित्त पत्रकारांचा गौरव
दापोली (प्रतिनिधी )
मराठी भाषा संवर्धन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात दापोली येथील जेष्ठ पत्रकार ‘दैनिक महाराष्ट्र टाइम्स’ चे प्रतिनिधी प्रसाद रानडे व दैनिक तरुण भारतचे प्रतिनिधी मनोज पवार यांचा ज्ञानदीप संस्थेच्या ज्ञानदीप माध्यमिक विद्यामंदिर दापोली कडून गौरव करण्यात आला. ज्ञानदीप माध्यमिक विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक व रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शाळा सेवक पतपेढी चे व्हॉइस चेअरमन किशोर नागरगोजे, विद्यालयाचे वरिष्ठ लिपिक महेश कदम, सहाय्यक शिक्षिका आर्या कालेकर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाचे आयोजक अध्यक्ष ज्येष्ठ शिक्षक किशोर नागरगोजे यांनी भाषा संवर्धनाचे महत्त्व तसेच स्वातंत्र्य लढ्यात घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर,लोकमान्य टिळक, दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी वृत्तपत्रांच्या माध्यमातून चालवलेली चळवळ महत्त्वाची राहिली अस मत व्यक्त केले. समाजातील अपप्रवृत्तींना वठणीवर आणण्याचे काम पत्रकार मंडळी करतात असे गौरवउद्गार त्यांनी यावेळी व्यक्त केले. शासनाने दिलेल्या 100 दिवसाच्या कार्यक्रमाच्या उपक्रमांतर्गत आयोजित मराठी भाषा संवर्धन सप्ताहानिमित्त मराठी भाषा संवर्धन सप्ताह निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ज्ञानदीप शिक्षण संस्थेच्या जडणघडणीत सहकार्याची भूमिका राहिलेल्या पत्रकारांचा प्रतिनिधिक सन्मान करण्यात आल्याचे सांगितलं.
मराठी वृत्तपत्र सृष्टीचा भारतीय स्वातंत्र्य लढ्यात मोठे योगदान राहिल आहे समाज प्रबोधन, ज्ञान प्रबोधन, स्वातंत्र्य लढ्याची चळवळ यासाठी मराठी वृत्तपत्र माध्यमांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली असं प्रतिपादन यावेळी उपस्थित पत्रकार प्रसाद रानडे यांनी केल. तसेच विद्यार्थ्यांना माध्यम क्षेत्रात असलेल्या संधी याबद्दल थोडक्यात विवेचन केलं
यावेळी उपस्थित पत्रकार मनोज पवार यांनी मराठी भाषा संवर्धनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना अधोरेखित करून सांगितलं. तुम्ही मुंबई शहरात गेलात तरी आपली मातृभाषा विसरू नका मातृभाषेतूनच बोला दैनंदिन व्यवहारात मराठी भाषेचा उपयोग करा असं सांगत आपल्या नातेवाईकांनीही याचे महत्त्व सांगा असं मनोगत व्यक्त केलं.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षिका आर्या कालेकर यांनी केलं तर प्रास्ताविक व आभार जेष्ठ शिक्षक किशोर नागरगोजे यांनी मानले.


