रत्नागिरी
रत्नागिरी जिल्हा पोलिस दल तर्फे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
प्रत्येक पोलीस ठाणे हद्दीमध्ये चालणाऱ्या जल्लोष कार्यक्रमांवर नजर ठेवण्याकरिता विशेष गस्ती पथकांची निर्मिती करण्यात आलेली आहे.
मद्य प्राशन करून हुल्लड वाजी, (Eve-Teasing) करणाऱ्यांवर विशेष लक्ष देण्यासाठी साध्या वेषातील पोलीस पथके कार्यरत ठेवण्यात येणार.
मद्य प्राशन करून वाहन चालवल्यास Breath Analyser या यंत्रा द्वारे चाचणी करुन कायदेशीर कारवाई करण्यात येणार.31 डिसेंबर 2024 तसेच 01 जानेवाटी 2025 या दिवशी, जल्लोष कार्यक्रम ठिकाणांवर विडियोग्राफी पथकाद्वारे 24×7 नजर ठेवण्यात येणार.
विदेशी पर्यटक महिलांची तसेच पट राज्यातून येणाऱ्या महिलांची छेडछाड होणार नाही याकडे महिला पथकांमार्फत विशेष लक्ष देण्यात येणार. सोशल मिडियावरील नववर्षाच्या स्वागताचे अश्लील आणि आक्षेपार्ह पोस्टवर सायबर पोलीस ठाणेद्वारे करडी नजर ठेवण्यात येणार.
अधिक माहिती करिता व मदतीकरिता डायल या क्रमांकावर संपर्क साधू शकता.कायद्याच्या बंधनांचे तसेच वाहतुकीच्या सर्व नियमांचे पालन करावे तसेच रत्नागिरी जिल्हयातील पर्यटन व पवित्र स्थळांचे जसे समुद्र किनारे, गड- किल्ले व मंहिट, यांचे पावित्र्य अवाधित राखण्याकरीता दक्षता घ्यावी व सभ्यतेचे वर्तन ठेवून रत्नागिरी पोलीस दलास सहकार्य करावे.”सर्वांना नव वषर्षाचे अभिनंदन…!श्री. धनंजय कुलकर्णी (भा. पो. से.) पोलीस अधीक्षक, रत्नागिटी
