*रत्नागिरी*
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, नेहरू युवा केंद्र व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय युवा महोत्सव नुकताच उत्साहात संपन्न झाला. युवकांचा सर्वांगीण विकास, परंपरा जतन करणे, कलागुणांना वाव देणे यासाठी जिल्हा, विभाग, राज्य व राष्ट्रीय स्तरावर युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन उपजिल्हाधिकारी (सा.प्र) शुभांगी साठे आणि शिक्षक पतपेढीचे संचालक सागर पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन आणि युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून करण्यात आले. यावेळी प्र. जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे, नेहरू युवा केंद्राचे जिल्हा समन्वयक मोहितकुमार सैनी, राज्य क्रीडा मार्गदर्शक सचिन मांडवकर, क्रीडा अधिकारी अक्षय मारकड, क्रीडा अधिकारी गणेश जगताप, राज्य क्रीडा मार्गदर्शक गणेश खैरमोडे आदी उपस्थित होते. उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी युवकांना जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याबाबत तसेच कला गुणांचा आपल्या जीवनात कसा उपयोग होतो, याबाबत आपले मनोगत व्यक्त करून युवकांना प्रोत्साहित केले.
जिल्हा समन्वयक श्री. सैनी यांनी कलेला फक्त कलेशी सिमित न ठेवता त्याच्याकडे करिअर म्हणून बघण्याबाबत व तशी वाटचाल सुरू ठेवण्याबाबतचे युवकांना मार्गदर्शन केले.स्पर्धेतील प्राविण्यप्राप्त विजेत्यांना पारितोषिक रोख रक्कम, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देवून मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. तसेच विविध स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.
विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण पुढीलप्रमाणे करण्यात आले.
विज्ञान प्रदर्शन (सामुहिक):- माध्यमिक विद्यालय, करबुडे प्रथम, मिस्त्री हायस्कूल, रत्नागिरी द्वितीय, गोगटे जोगळेकर कॉलेज, रत्नागिरी- तृतीय. विज्ञान प्रदर्शन (वैयक्तिक) अवधुत बागल प्रथम, विदुर नेवाळकर – द्वितीय, रोहन सकपाळ तृतीय.
लोकगीत (सामुहिक):- गोगटे कॉलेज रत्नागिरी प्रथम, आनंदराव पवार कॉलेज, चिपळूण -द्वितीय,
पटवर्धन हायस्कूल, रत्नागिरी – तृतीय. लोकगीत (वैयक्तिक) गौतमी वाडकर प्रथम, सेजल तांबे द्वितीय, नक्षत्रा जावडेकर तृतीय.
लोकनृत्य (सामुहिक) :- कै. नाथ पै. विद्यालय व क. महाविद्यालय, लांजा प्रथम, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक विद्यालय, रत्नागिरी द्वितीय, पटवर्धन हायस्कूल, रत्नागिरी तृतीय.
लोकनृत्य (वैयक्तिक) रुजूला मुळे प्रथम, रम्बिर पवार द्वितीय, तन्वी गुरव तृतीय.
कथालेखन :- किरण टक्के प्रथम, आरजू काझी द्वितीय, मालवी होरंबे तृतीय
कवितालेखन :- अनुष्का बापट प्रथम, संजित भडेकर द्वितीय, आरजू काझी तृतीय.
चित्रकला स्पर्धा :- अक्षय वहाळकर प्रथम, ओंकार घवाळी द्वितीय, राज कांबळे – तृतीय.
वत्कृत्व स्पर्धा :- हर्ष नागवेकर प्रथम, ओंकार आठवले द्वितीय, वंशिता भाटकर तृतीय.
मोबाईल फोटोग्राफी स्पर्धा :- मयुरेश तांबे प्रथम, आर्यन जुवेकर द्वितीय, तेजस भाटकर – तृतीय.
हस्तकला :- आकांक्षा कारकर प्रथम, कस्तुरी कांबळे द्वितीय, महेक मुजावर व समिक्षा पवार तृतीय.
वस्त्रोद्योग :- स्वरदा दामले प्रथम, कस्तुरी कांबळे – द्वितीय.
अॕग्रो प्रोडक्ट :- श्रुती बेंद्रे प्रथम, मैत्रेयी सरदेसाई – द्वितीय, सार्थक मोरे तृतीय.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्र. जिल्हा क्रीडा अधिकारी शिंदे यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋतिक चव्हाण यांनी केले.
