कोळबांद्रे केंद्रांतर्गत क्रीडा स्पर्धा संपन्न
दापोली प्रतिनिधी
खेळाद्वारे सर्वांगीण विकास साधता येतो असे कोळबांद्रे केंद्रांतर्गत कोळबांद्रे नं.१ शाळा गावचे सर्व ग्रामस्थ आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या नेटक्या नियोजनामुळे स्पर्धा यशस्वी झाल्याचेही गौरवउद्गार संजय जंगम यांनी यावेळी व्यक्त केले.दापोली तालुक्यातील कोळबांद्रे येथील क्रीडानगरीत जि.प.शाळांच्या केंद्रस्तरीय हिवाळी क्रीडास्पर्धा नुकत्याच संपन्न झाल्या यावेळी नियोजीत अध्यक्ष संजय जंगम बोलत होते. दापोली तालुक्यातील साखळोली,शिवाजीनगर,सडवे,शिवनारी,गावतळे आणि कोळबांद्रे गावातील सर्व शाळेतील विद्यार्थी सदर क्रीडास्पर्धेत सहभागी झाले होते. यावेळी जनरल चॅंपियन ट्राॅफी कोळबांद्रे नं. १ शाळेने पटकावली.प्रारंभी प्रभाग विस्तारअधिकारी, बळिराम राठोड तसेच गावचे सरपंच रघुनाथ गुरव, उपसरपंच शशिकांत शिगवण ,महादेव कोळबांद्रेकर,शांताराम मोहिते,अविनाश लोखंडे अरविंद कराडे केंद्रप्रमुख संजय जंगम,शाळाव्यवस्थापन समिती अध्यक्षा सायली कराडे , तंटामुक्ती अध्यक्ष दशरथ बेर्डे,तसेच सर्व शिक्षक यांचे उपस्थित उद्घाटन झाले,दिवसभर चाललेल्या स्पर्धांमध्ये खिलाडूवृत्तीने विद्यार्थ्यांनी साहभाग नोंदवला. संपुर्ण सोहळ्याचे सुत्रसंचालन संदेश चव्हाण यांनी केले. सर्व यशस्वी स्पर्धकांना मान्यवरांचे हस्ते प्रशस्तीपत्र,व ट्राॅफी देऊन गौरविण्यात आले.
