रत्नागिरी
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था तथा जिल्हा प्रशासकीय प्रशिक्षण संस्था या कार्यालयाच्या नूतन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण उद्या शनिवार दि. ४ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते मौजे कुवारबाव येथे आयोजित करण्यात आले असल्याचे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सुशील सुजाता सुरेश शिवलकर यांनी कळविले आहे.
यावेळी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, शालेय शिक्षण, गृह (ग्रामीण) राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, गृह (शहरे), महसूल, ग्रामविकास व पंचायत राज राज्यमंत्री योगेश कदम, खासदार सुनील तटकरे, खासदार नारायण राणे, आमदार निरंजन डावखरे, आमदार प्रसाद लाड, आमदार भास्कर जाधव, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार शेखर निकम, आमदार किरण सामंत यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे
*या प्रशासकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती*
या कार्यक्रमाला जिल्ह्यातील व राज्याच्या शिक्षण विभागातील उच्च पदस्थ प्रशासकीय उपस्थित राहणार आहेत. प्रशासकीय अधिकारी संचालक राहुल रेखावार, शिक्षण आयुक्त सचिद्र सिंग, शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीत देओल, रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारीअधिकारी कीर्ती कुमार पुजार, जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग, कोल्हापूर विभागीय शिक्षण उपसंचालक महेश चोथे आदी प्रशासकीय अधिकारी कर्मचारी उपस्थित राहणार आहेत अशी माहिती जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सुशील शिवलकर यांनी दिली आहे
