माजी आमदार सूर्यकांत दळवी शांताराम पवार आदींची उपस्थिती
दापोली प्रतिनिधी
दापोली तालुक्यातील नवरत्न शिक्षण संस्था व सारंग पंचक्रोशी माध्यमिक विद्यालयाचा रौप्य महोत्सवी सोहळा नुकताच सारंग विद्यालयात आणि संपूर्ण पंचक्रोशी मध्ये मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. यानिमित्ताने विद्यालयात विविध शैक्षणिक व आरोग्य विषयक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी पंचक्रोशीतील जि प शाळा व सारंग हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम तसेच रौप्य महोत्सवी सोहळ्याच्या निमित्ताने संस्थेच्या व शाळेच्या वतीने प्रकाशित होणाऱ्या “नवरत्न” स्मरणिकेचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला या नवरत्न स्मरणिकेचे प्रकाशन दापोलीचे माजी आमदार सूर्यकांत जी दळवी तसेच नवरत्न शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शांताराम पवार,मुंबई मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत बाईत मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष आयुब मुल्ला राज्य मुख्याध्यापक महामंडळ मुंबई चे कोषाध्यक्ष संदेश राऊत दापोली तालुका मुख्याध्यापक संघाचे सचिव सुनील देसाई ताडील केंद्राचे केंद्रप्रमुख गुलाबराव गावित यांच्या उपस्थितीत पार पडला.
त्यामध्ये शोभायात्रा व शैक्षणिक दिंडी अडखळ पाटील वाघवे म्हैसोंडे, कळंबट, सारंग, बांधतिवरे, ताडील सुरेवाडी, ताडील सायटेवाडी मार्गे कोंगळे या संपूर्ण पंचक्रोशीत पायी शैक्षणिक दिंडी काढण्यात आली. मोठ्या उत्साहात शैक्षणिक दिंडीचे ग्रामस्थांनी व महिला मंडळांनी स्वागत केले यानिमित्ताने परिसरात शैक्षणिक जागृती पथनाट्याच्या द्वारे करण्यात आली
त्याचबरोबर 27 डिसेंबर रोजी सारंग पंचक्रोशीतील ग्रामस्थ व महिला व परिसरातील लोकांसाठी मोफत डोळे तपासणी व मोफत चष्मे वाटप शिबिर तसेच सत्यनारायण महापूजा व महाप्रसाद महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ व आरोग्य विषयक मार्गदर्शन विद्यालयांमध्ये आयोजित करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमाला “साधू वासवानी चारिटेबल ट्रस्ट” अंतर्गत “बुधरानी आय हॉस्पिटल पुणे “चे तज्ञ तंत्रज्ञ तसेच दापोलीतील प्रसिद्ध डॉ.विद्याताई दिवाण व लोककल्याण समितीच्या सदस्या रुचिता नलावडे, श्री पाते यांनी महिला व ग्रामस्थांना आरोग्य विषयक मार्गदर्शन केले.
दिनांक 28 डिसेंबर रोजी माजी विद्यार्थी स्नेह मेळावा व माजी विद्यार्थी हितगुज समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. 2000 -2001 पासूनचे अनेक माजी विद्यार्थी विद्यार्थिनी खास या माजी विद्यार्थी मेळाव्यासाठी उपस्थित होते याचे नियोजन माजी विद्यार्थी संघटनेचे मुंबई अध्यक्ष श्री विश्वनाथ राजपुरे व ग्रामीणचे अध्यक्ष संतोष पेंढारी यांनी शाळेच्या मदतीने केले होते. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे यासाठी मोलाचे सहकार्य लाभले अनेक माजी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना आपल्या मनोगताच्या माध्यमातून उजाळा दिला. यावेळी माजी विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षक व संस्था पदाधिकाऱ्यांचा मोठा पुष्पहार घालून सन्मान केला.
यावेळी नवरत्न शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शांताराम पवार साहेब व उपाध्यक्ष नरेंद्र करमतकर यांनी संस्था सुरू करताना व चालवताना किती संघर्ष करावा लागला तसेच कोणा कोणाचे सहकार्य मिळाले याची आठवण सांगितली. सारंग पंचक्रोशी माध्यमिक विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर वृंदांच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष शांताराम पवार यांचा सन्मानपत्र शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला यावेळी ताडील केंद्रातील सर्व जि प शाळांचे मुख्याध्यापक , शिक्षक व केंद्रप्रमुखांच्या वतीने शांताराम पवार व मुख्याध्यापक संतोष हजारे यांचा शाल श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
तसेच नवरत्न शिक्षण संस्थेच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते विद्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांना सन्मानपत्र देऊन सपत्नीक गौरविण्यात आले. या समारंभासाठी संस्थेचे उपाध्यक्ष श्री नरेंद्र जी करमरकर सचिव डॉक्टर सुनील गोरीवले सहसचि सुचिता पवार
सह खजिनदार तानाजी भुवड कार्यकारी सदस्य राजेंद्र बोथरे, सुलतान आराई,सौ वर्षा शिर्के, नंदकिशोर भागवत, चंद्रकांत शिगवण संतोष पेंढारी मुंबई मंडळाचे पदाधिकारी शंकर कांगणे श्री.काशिराम, धर्मेश रहाटवळ, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भास्कर जोशी, सारंगच्या सरपंच सुषमा जोशी, ताडीलचे सरपंच शंकर खापरे ,कळंबट च्या सरपंच साक्षी महाडिक बांधतिवरेचे सरपंच दत्ताराम साळवी, श्याम भुवड, विजय जोशी, जयेश आग्रे, अजित जोशी,समाधान पैठणे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक महेश खेडेकर श्री संतोष सकपाळ, विनोद गिम्हवणेकर, श्री राजेंद्र पाडवी, गणेश कदम ,सलीम दाभिळकर, रेवाळे मॅडम, निकम मॅडम, प्रमोद बोरसे, जलालुद्दीन सर ,महेंद्र पारदुले , प्रमोद गुंजाळ, डोंगरगावे सर ,श्री हनमंत गरंडे , सुप्रिया जगदाळे ,श्रीम चव्हाण मॅडम, सौ शिंदे मॅडम, अंगणवाडी सेविका सौ गीता महाजन, शाळेचे मुख्याध्यापक श्री संतोष हजारे शाळेचे सहाय्यक शिक्षक सुहास धाडवे,सरोज पैठणे, शशिकांत मेंगाणे, लिपिक राजेश पवार ,शिपाई सुधीर शिगवण, स्वप्नील जाधव शाळेचे मुंबई व पुणे येथून आलेले अनेक माजी विद्यार्थी सारंग पंचक्रोशीतील सर्व वाड्यांचे अध्यक्ष महिला मंडळाच्या अध्यक्षा, पंचक्रोशीतील सर्व गावांचे पोलीस पाटील व सर्व पदाधिकारी ग्रामस्थ विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

