कुडाळ पोलीस ठाण्याची झाली वार्षिक तपासणी
*सिंधुदुर्ग*
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलीस स्थानकांच्या कामाची तपासणी गुन्हेशाबित करण्याचा रेट गुन्हे नोंदवण्याची कार्यपद्धती महिलांविरुद्ध चे गुन्हे सायबर गुन्हे इत्यादी कामकाज योग्य प्रकारे व्हावे यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी जिल्ह्यातील कुडाळ पोलीस स्थानकाची केलेल्या वार्षिक निरीक्षण तपासणी कार्यक्रमात फक्त सूचना दिल्या आहेत.
दोन दिवसांपूर्वी 29 नोव्हेंबर रोजी सौरभ कुमार अग्रवाल, पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग यांच्याकडून कुडाळ पोलीस ठाणेची वार्षिक निरीक्षण तपासणी घेण्यात आली. यावेळी तपासणीत कुडाळ पोलीस ठाणेतील प्रलंबित गुन्हे, गंभीर गुन्हे, महिलांविरुध्दचे गुन्हे, सायबर गुन्हे इ. बाबत आढावा घेवुन योग्य पध्दतीने तपास करावा. तसेच गुन्हे शाबीतीच्या दृष्टीने समन्स-वॉरट योग्यवेळी बजावणी करुन फिर्यादी, पंच, साक्षीदार इत्यादींशी समन्वय ठेवुन जास्तीत-जास्त गुन्हे शाबित होतील याकडे लक्ष देणेबाबत पोलीस निरीक्षक, कुडाळ पोलीस ठाणे यांना सुचना देण्यात आल्या आहेत.
त्यानंतर मा. पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग यांनी कुडाळ पोलीस ठाणे नेमणुकी पोलीस अंमलदार यांचेशी वैयक्तीक बोलवुन त्यांना भारतीय न्याय संहिता 2023 व भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 या नवीन कायद्याविषयी मार्गदर्शन केले. त्यांचे पोलीस विभागातील कामकाजाचे मुल्यमापन करुन सेवापुस्तकात तशा नोंदी घेण्यात आल्या.
*पोलीस पाटील यांनी घटना तातडीने कळवा*
तसेच कुडाळ पोलीस ठाणेत वार्षीक निरीक्षण तपासणी दरम्यान पोलीस पाटील यांची देखील बैठक घेण्यात आली. नमुद बैठकीस 68 पोलीस पाटील उपस्थित होते. बैठकीमध्ये मा. पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग यांनी हजर असलेल्या पोलीस पाटील यांची ओळख करुन घेवुन त्यांना आप-आपल्या गावातील व शहरातील छोट्या-मोठ्या सर्व घडामोडी आपले बिट अंमलदार तसेच दुरक्षेत्र अंमलदार यांना द्याव्यात. तसेच गावांत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवणार नाही याची दक्षता घेणेबाबत सुचना दिल्या आहेत.
*समस्या ऐकण्यासाठी घेतला कर्मचारी दरबार*
त्यानंतर मा. पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग यांनी कुडाळ पोलीस ठाणे नेमणुकी पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा दरबार घेवुन त्यांच्या वैयक्तीक, कौंटुबिक, वैद्यकिय अडी-अडचणींबाबत माहिती घेवुन जास्तीत-जास्त समस्या सोडवताना त्यांच्याजवळ संवाद साधून मार्गदर्शन केले. अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्ह्याचे स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी दिली
