रत्नागिरी
कोकणातील मिनी महाबळेश्वर म्हणून ओळख असलेल्या दापोलीच्या तापमानाने आठ अंशांची पातळी घडली आहे या कमी झालेल्या तापमानाने कोकणातील मिनी महाबळेश्वर म्हणून खास ओळख असलेल्या दापोलीत हुडहुडी भरली आहे. गेले काही दिवस थंडीची लाट सुरू असून दापोलीचा पारा हा दहा ते अंशांच्या आसपास घुटमळत होता मात्र शनिवारी पहाटे 8.8 अंश इतकी कमी तापमानाची नोंद डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या हवामान प्रक्षेत्रावर झाली आहे. तर दुसऱ्या दिवशी आज रविवारी सकाळी 11 अंश इतकी तापमानाची नोंद झाली आहे. यापूर्वी काहीवर्षांपुर्वी 4.5 अंशांवर आल्याची नोंद झाली आहे.दापोली येथे दरवर्षी दहा अंशांच्या खाली तापमान येते हे खास वैशिष्ट्य आहे. विस्तृत समुद्रकिनारा, ऐतिहासिक गड किल्ले, आणि ऐतिहासिक संदर्भ असलेले पर्यटनस्थळ असलेला दापोली तालुका आपलं आराध्य दैवत श्री शिव छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झाला आहे. कोकण किनारपट्टी ची मजबूत तटबंदी राहावी यासाठी समुद्रात असलेला सुवर्णदुर्ग किल्ल्याला महाराजांनी भेट दिल्याची नोंद आहे. याचबरोबर दापोली हे थंड हवेचे ठिकाण म्हणून ब्रिटिशांनीही कॅम्प निवडले होते. दापोलीची हीच ओळख आजही कायम टिकून आहे. दापोली तालुका हा कोकणातील पर्यटन स्थळ म्हणून ओळखलं जाते. दापोली शहरापासून अवघ्या सुमारे सात ते आठ किलोमीटरवरती भुरळ घालणारा स्वच्छ समुद्रकिनारा आहे. समुद्र सपाटीपासून दापोली शहर हे उंचावर आहे दापोली शहरातील हवामान हे वैशिष्ट्यपूर्ण आहे म्हणूनच त्याची कोकणात मिनी महाबळेश्वर अशी खास ओळख आहे. याच दापोली शहरातील एका विशिष्ट ठिकाणावरून समुद्रकिनाराही दिसतो त्यामुळेच त्यांचा मायदेशी जाणारा मार्ग दिसतो तेच दापोली हे ठिकाण थंड हवेचे ठिकाण म्हणून ब्रिटिशांनी कॅम्प साठी निवडले होते.
