कोकणातील या गावात योग शिबिराला मोठा प्रतिसाद
दापोली तालुक्यात जालगाव येथील योग प्रशिक्षकांचा उपक्रम
दापोली प्रतिनिधी
योग प्राणायाम दररोज करण्याची सवय व्हावी, त्याची माहिती व्हावी, योग कशाप्रकारे करायचा याची शास्त्रोक्त माहिती मिळावी यासाठी दापोली शहराजवळ असलेल्या जालगाव ग्रामपंचायत येथे दापोली तालुक्यातील योग शिक्षकांनी केले नि:शुल्क योग शिबिराचा मोठा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.जलस्वराज्य ग्रामपंचायत जालगाव येथे श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज सभागृहात हा प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला आहे.
दापोलीत 01 डिसेंबर ते 08 डिसेंबर या कालावधीत हा निःशुल्क सेवा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. जालगाव येथील योग शिबिर तज्ञ विश्वास फाटक यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम होणार आहे. दररोज 8 डिसेंबरपर्यंत सकाळी 5:45 ते सकाळी 7.00 या वेळेत हा उपक्रम सुरू झाला आहे.
या योग शिबिरासाठी दापोली येथील योग प्रशिक्षकांनी मोठा पुढाकार घेतला आहे. जलस्वराज्य ग्रामपंचायत जालगाव येथे योग, प्राणायाम, ध्यान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी सर्व योग प्रेमींनी या शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. असं आवाहन करण्यात आले आहे.
यासाठी मुख्य योग शिक्षक शैलेश आठले, सहाय्यक योग शिक्षक नंदा साळूंके, सविता मोरे, मानसी साळुंके, विश्वास फाटक (योग गुरु), योगशिक्षक प्रराग केळसकर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
