दापोली प्रतिनिधी
सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूल, करंजाणीने इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड परीक्षेत उत्तम यश संपादन केले. ही परीक्षा 2024 च्या नोव्हेंबर महिन्यात आयोजित केली गेली होती. इंटरनॅशनल इंग्लिश ऑलिम्पियाड परीक्षेमध्ये* आहान अमृते,मिताली गोसाळकर,श्रेयांश मुलुख इयत्ता पहिली,समर्थ म्हस्के इयत्ता दुसरी अशा ४ विद्यार्थ्यांची दुसऱ्याफेरीसाठी निवड झाली आहे.
इंटरनॅशनल विज्ञान ऑलिम्पियाड परीक्षेमध्ये* अवनी तलाठी,स्वरा मेहता, डेनियल देशमुख इयत्ता तिसरी आणि आराध्य मेहता इयत्ता सातवी अशा ४ विद्यार्थ्यांची दुसऱ्याफेरीसाठी निवड झाली आहे.
इंटरनॅशनल जनरल नॉलेज ऑलिम्पियाड परीक्षेमध्ये आहान अमृते,मिताली गोसाळकर,श्रेयांश मुलुख, ताईश ऐनेरकर इयत्ता पहिली, समर्थ म्हस्के इयत्ता दुसरी,अयान मोरे इयत्ता पांचवी,अहमद रजा लांगा इयत्ता सहावी,आराध्य मेहता इयत्ता सातवी अशा ८ विद्यार्थ्यांची दुसऱ्याफेरीसाठी निवड झाली आहे.
इंटरनॅशनल गणित ऑलिम्पियाड परीक्षेमध्ये आहान अमृते,मिताली गोसाळकर इयत्ता पहिली, विहान मयेकर इयत्ता पांचवी,आराध्य मेहता इयत्ता सातवी अशा ४ विद्यार्थ्यांची दुसऱ्याफेरीसाठी निवड झाली आहे.
जागतिक स्तरावर या परीक्षा घेतल्या जात असल्यामुळे यातील यशाला विशेष महत्त्व आहे. संस्थेचे व शाळेचे अध्यक्ष सुजय मेहता, मुख्याध्यापिका रितू मेहता व संपूर्ण शिक्षकवृंदाने विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.
*रत्नागिरी जिल्हा क्रॉस कंट्री स्पर्धेत साईप्रसाद उत्पल वराडकर याला रौप्य पदक तर राज्यस्तरीय क्रॉस कंट्री स्पर्धेसाठी निवड*
दापोलीत रविवार दिनांक 22 डिसेंबर रोजी डेरवण येथे रत्नागिरी जिल्हा क्रॉस कंट्री स्पर्धेत सोळा वर्षाखालील गटात *सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूल करंजाणीचा साईप्रसाद उत्पल वराडकर यांनी द्वितीय क्रमांक संपादन करून रौप्य पदक प्राप्त केले. त्याची पुढे अमरावती येथे होणाऱ्या राज्यस्तरीय क्रॉस कंट्री स्पर्धेत निवड झाल.
शाळेचे चेअरमन सुजय मेहता, मुख्याध्यापिका रितू मेहता तसेच शाळेचे शिक्षक वृंद आणि कर्मचारी वर्ग आणि त्याचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या….

