बेलोसे घराण्याच्या सुनबाईंनीही व्यक्त केला आनंद
रत्नागिरी
शिवसेना नेते माजी पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम यांचे सुपुत्र शिवसेनेचे दापोली खेड मंडणगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश कदम आज राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये यासाठी मोठे उत्साह च वातावरण आहे खेडमध्ये हा शपथविधी सोहळा स्क्रीनवर दाखवला जाणार आहे. मतदारसंघातील काही पदाधिकारी व कार्यकर्ते नागपूर येथे पोहोचले आहेत. शिंदे साहेबांनी माझ्यावर विश्वास दाखवत मोठी जबाबदारी दिली आहे. त्याचा उपयोग कोकणासाठी व महाराष्ट्रासाठी विकासासाठी माझ्या मतदारसंघासाठी होईल. माझ्यासाठी हा सगळ्यात आयुष्यातला मोठा दिवस असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेचे युवानेते आमदार योगेश कदम यांनी दिली आहे. 49 वर्षांनी दापोलीला मिळणार मंत्रिपद मिळणार आहे. 1975 तत्कालीन काँग्रेसचे कोकणातील नेते रामचंद्र विठ्ठल तथा बाबुराव बेलोसे आमदार असताना त्यांच्यावर काँग्रेस कडून राज्यमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यानंतर आता दापोली मतदारसंघाचे मंत्री होणारे योगेश कदम हे दुसरे आमदार ठरले आहेत.
योगेश कदम यांची राजकीय कारकीर्द सुरुवात ही युवा सेनेपासून झाली युवा सेनेचे ते कोर कमिटी सदस्य होते. 2014 साली सूर्यकांत दळवी यांच्या पराभवानंतर दापोली मतदारसंघातील सेनेची जागा परत मिळावी यासाठी त्यांनी दापोली मतदार संघात लक्ष घातलं. त्यावेळी त्यांनी आमदार नसतानाही अनेक विकास काम केली सातत्याने संपर्क ठेवला. 2019 साली शिवसेनेकडून दापोली मतदार संघाची उमेदवारी मिळाली राष्ट्रवादीचे उमेदवार माजी आमदार संजय कदम यांचा पराभव करून दापोलीचा शिवसेनेच्या हातून गेलेला मतदारसंघ हा शिवसेनेच्या ताब्यात परत मिळवण्यात त्यांना मोठे यश आलं. त्यानंतर त्यांची कार्यपद्धती मोठा जनसंपर्क लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत असलेल्या त्यांचा मोठा जनसंपर्क सहज संवाद, महिला बचत गटांसाठी केलेले काम या सगळ्याची विकास कामांची दखल घेऊन त्यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास ठेवत शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली आणि हा शिवसेना भाजपा राष्ट्रवादी या महायुतीने टाकलेला विश्वास सार्थ करून दाखवत त्यांनी तब्बल 24798 मतांनी विजय मिळवला आणि ते दापोली चे दुसऱ्यांदा आमदार झाल्यावर आज ते मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. दापोली शिवसेनेचे तालुका उमेश राजे, शहर प्रमुख स्वप्निल पारकर महिला आघाडीच्या रोहिणी दळवी भाजपाचे तालुकाध्यक्ष संजय सावंत या महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत योगेश कदम यांच्या मंत्रीपदाचा आनंदउत्सव साजरा केला
आज दापोलीला पुन्हा एकदा मंत्रीपद याचा मोठा आनंद – रमा बेलोसे
आज बरोबर ५० वर्षांनी दापोली विधानसभा मतदार संघाकडे पुन्हा एकदा मंत्रीपद आलं या आधी माझे थोरले सासरे माजी राज्यमंत्री कै.बाबुराव बेलोसे यांनी मंत्री म्हणून विकास कार्य केले आणि आता आमदार युवानेते योगेशदादा कदम यांना ही संधी मिळाली याचा खूप मनापासून आनंद होत आहे. आणि त्याहून महत्त्वाच म्हणजे योगेशदादा हे महायुतीचे उमेदवार असल्यामुळे बेलोसे म्हणुन काम करण्याची संधी मिळाली त्यांच्या हया यशात खारीचा वाटा उचलण्याचे भाग्य मिळाले ह्याचा सार्थ अभिमान वाटत आहे. दापोली मतदार संघातील एक मतदार म्हणून आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक कार्यकर्ता म्हणून आजचा दिवस आनंदाचा आणि उत्सवाचा आहे! योगेश दादा तुमचे मनापासून अभिनंदन आणि पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा आहेत अशी प्रतिक्रिया बाबूराव बोरसे यांच्या सुनबाई सौ.रमा सुशांत बेलोसे राष्ट्रवादी काँग्रेस, महिला प्रदेश सरचिटणीस यांनी व्यक्त केली आहे.

