गटशिक्षणाधिकारी श्री बळवंतराव यांची उपस्थिती
दापोली प्रतिनिधी
विद्यार्थ्यांचे कौतूक केले पाहिजे त्यामुळे पतपेढी विद्यार्थी गुणगौरव करून विद्यार्थ्यांचे कौतुक करणारा हा पतपेढीचा उपक्रम खूप चांगला आहे त्याचबरोबर पतपेढीचा पारदर्शक कारभार चाललेला आहे हे सभासदा कडून ऐकायला मिळते त्यामुळे सर्व संचालकाच्या अभिनंदन अशी शब्दात दापोली तालुक्याचे गटशिक्षणअधिकारी श्री. बळवंतराव यांनी कौतुक केले. दापोली येथे रविवारी विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्यात ते बोलत होते दापोली शहरात राधाकृष्ण मंदिर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी पतसंस्थेच्या सभासद प्रशिक्षणाचेही आयोजन करण्यात आलं होतं. दापोली तालुक्यातील 42 गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा यावेळी संपन्न झाला.
रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शाळा सेवक सहकारी पतपेढी मर्यादित रत्नागिरी शाखा दापोली वतीने सभासद प्रशिक्षण कार्यक्रम व विद्यार्थी गुणगौरव सोहळा रविवार दिनांक 22 डिसेंबर 2024 रोजी आयोजित करण्यात आला होता. या गुणगौरव सोहळ्याला रत्नागिरी जिल्हा माध्यमिक सेवक सहकारी पतसंस्था चेअरमन सागर पाटील ज्ञानदीप शिक्षण संस्थेच्या माध्यमिक विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक व पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन किशोर नागरगोजे व सर्व संचालक, मुरुड हायस्कूल शिक्षक व दापोली शाखा संचालक बिपीन मोहीते,अयुब मुल्ला अध्यक्ष माध्यमिक उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ रत्नागिरी जिल्हा,
संदेश राऊत राज्य मुख्याध्यापक महामंडाळाचे राज्य कोषाध्यक्ष, गिरीष पाटील माजी व्हाईस चेअरमन पतपेढी, रोहीत जाधव सचिव टिडीएफ रत्नागिरी,
संतोष हजारे सर तज्ञ-संचालक, आकाराम महिंद तज्ञ संचालक, सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सर्व संघटनाचे पदाधिकारी उपस्थित सर्व गुणवंत विद्यार्थी व पालक उपस्थित होते.सुत्र संचालन श्री नरवणकर सर मुरुड हायस्कूल यांनी केले तर आभार श्री महिंद सर तज्ञ संचालक यांनी मानले.

