घार हिंडते आकाशी लक्ष तिचे पिलापाशी
मतदारसंघाला आश्वस्त करत विरोधकांना सुनावले खडे बोल

दापोली प्रतिनिधी
दापोली मतदारसंघातल्या प्रत्येक नागरिकावरती माझं लक्ष असेल प्रत्येक गाव वाडीत माझं लक्ष असेल हा फेटा मी आज तुमच्यामुळे घालू शकलो आयुष्यभर तुम्हाला हा योगेश कदम कधीही विसरणार नाही आज तुमच्यामुळे मी आमदार झालो मंत्री झालो असं सांगत यापूर्वी आपण साडेतीन हजार कोटी रुपयांची विकास कामावर आणली आणि आता आपण मंत्री झालो आहोत आता साडेपाच हजार कोटी रुपयांची विकास कम मतदारसंघात करू अशी ग्वाही गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दापोली येथे बोलताना दिली.दापोली आयोजित नागरिक सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. आपल्याला मंत्रिमंडळाची संधी दिल्याबद्दल त्यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही विशेष आभार मनात त्यांच्या सहकार्यामुळे आपण मंत्री झालो असेही गौरवउद्गार त्यांनी यावेळी व्यक्त केले.
आपले वडील रामदास भाई कदम यांचे मंत्रीपद आपण पाहिल आहे त्यांनी जसं मंत्री म्हणून काम करताना गाजवलं तसंच काम करण्याचा आपला प्रयत्न राहील अशी ही ग्वाही त्यांनी यावेळी दिली. योगायोगाने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी भाईंना गृहराज्यमंत्रीपद केलं होतं तेच खातं शिंदे साहेबांनी मला दिला आहे असाही योगायोग ही आठवण यावेळी योगेश कदम यांनी सांगितली
ते पुढे म्हणाले की, दापोलीला यापूर्वी शिवसेनेचा पंचवीस वर्षे आमदार होते मात्र कधीही मंत्रालय आपल्याला पाहता आला नाही मात्र आता हा मंत्रालयात तुमचा योगेश दादा बसला आहे मंत्रालयाच झालं हक्काच्या दापोली मतदारसंघासाठी आहे असं सांगत आता तुमची कोणतीही काम अडणार नाहीत आपण मंत्रालयात आहोत अशीही ग्वाही त्यांनी यावेळी दिली. यापूर्वी बेलोसे घराण्यातील बाबुराव बेलोसे हे 49 वर्षांपूर्वी राज्यमंत्री होते त्यांच्या नंतर आता आपल्याला ही संधी मिळाली आहे आणि ही संधी मला तुम्ही दिली आहात मी तुम्हाला आयुष्यभर विसरणार नाही असेही गौरवउद्गार त्यांनी यावेळी व्यक्त केले.
*विरोधकांना वाटत असेल पण तसे होणार नाही….*
विरोधकांना आता वाटत असेल आता योगेश कदम मंत्री झाला आहे तो आता महाराष्ट्रात फिरेल म्हणजे दापोली मतदार संघात आपल्याला रान आता मोकळे मिळेल पण तसं होणार नाही लक्षात ठेवा ‘घार फिरे आकाशी चित्त तिचे पिलापाशी’ अशा शब्दात पदाधिकारी व कार्यकर्त्यांना अस्वस्थ करत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विरोधकांना सुनावले आहे मतदार संघात आयोजित नागरिक सत्कार सोहळ्याप्रसंगी ते दापोली येथे बोलत होते.
आपल्याकडे गृह शहरी राज्यमंत्री, महसूल, अन्न व नागरी पुरवठा, औषध प्रशासन, ग्रामविकास अशी सगळी महत्त्वाची खाती आली आहेत. त्यामुळे आपली जबाबदारी वाढली आहे तुमचा आमदार मंत्री झालाय म्हणजे तुम्ही प्रत्येकजण मंत्री आहात मात्र प्रत्येकाने जबाबदारीने वागा आता आपला दादा मंत्री झाला आहे म्हणून प्रत्येकाने काही झालं तरी दादा पाहील असं न करता प्रत्येकाने जबाबदारीने वागा आपली आता जबाबदारी वाढली आहे असाही प्रेमाचा सल्ला योगेश कदम यांनी दिला.
यावेळी व्यासपीठावर शिवसेनेची पदाधिकारी सुधीर कालेकर, प्रदीप सुर्वे, किशोर देसाई,उन्मेष राजे,निलेश शेठ, रोहिणी दळवी, सुनील दळवी, चारुता कामतेकर दीप्ती निखार्गे, शबनम मुकादम, भाजपाचे जिल्हाध्यक्ष केदार साठे तालुकाध्यक्ष संजय सावंत, भाऊ इदाते, स्वरूप महाजन तसेच राष्ट्रवादीचे तालुकाप्रमुख जयवंत जालगावकर, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या माजी नगराध्यक्ष विनिता शिगवण,प्रीती जैन आधी महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
