दापोलीत इस्त्रो नासा दौर्यासाठी उद्या तालुका स्तरीय चाळणी परीक्षा
दापोली प्रतिनिधी
मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तिकिरण पुजार यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेचा जि.प. शाळेत शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाकांक्षी उपक्रम इस्त्रो नासा अभ्यासदौरा. तोही सामान्य कुटूंबातील विद्यार्थी गेले चार वर्षे लाभ घेत आहेत.सदर दौर्यासाठी विविध चाळणी परीक्षेतून यशस्वी विद्यार्थ्यांना ही संधी मिळत असते,चालू शै.वर्षासाठी दापोली तालुक्यात केंद्र स्तर चाळणी परीक्षा दिनांक १९ डिसें 24रोजी २७ केंद्रामधून पार पडली त्यामध्ये मराठी माध्यम १९९० तर उर्दू माध्यम २९६ असे एकूण २२८६ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. यातील तालुका स्तरावर चाळणी परीक्षेसाठी १६८ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून, तालुकास्तरीय चाळणी परीक्षा उद्या दिनांक २६डिसें. रोजी सोहनी प्राथमिक विद्यालय दापोली येथे सकाळी ११ ते १२ या वेळेत आयोजित करण्यात आली असून सर्व यंत्रणा त्यासाठी सज्ज आहे तालुकास्तरीय चाळणी परीक्षेतून जिल्हास्तररीय चाळणीसाठी १० यशस्वी विद्यार्थ्यांना पाठविण्यात येणार असून, त्यामधून नासा इस्त्रो अभ्यास दौर्यासाठी पाच विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे.आपल्या विद्यार्थ्याची निवड व्हावी यासाठी शिक्षकही प्रयत्न करीत असून,जिल्हा परिषदेच्या या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील सामान्य कुटूंबातील मुलांना संधी मिळत असून,जिल्हापरिषदेने सुरु केलेला हा उपक्रम म्हणजे स्वप्नवत असून, होतकरु विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी आहे असे तालुका गटशिक्षणाधिकारी अण्णासाहेब बळवंतराव यांनी सांगितले.
