खेड प्रतिनिधी
खेडमधील एआयसीपीई योग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी नुकत्याच गोव्यामधील आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिप स्पर्धा जिंकून योग कॉलेजचे पर्यायाने महाराष्ट्राचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचाविले.याची दखल घेत महाराष्ट्राचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा दापोली येथे भव्य सन्मान केला.
वरील स्पर्धा जनरल स्पोर्ट्स अथॉरिटी दुबई (UAE) च्या अंतर्गत घेण्यात आल्या होत्या. महाराष्ट्र स्पोर्ट्स फिजिकल फिटनेस बोर्डच्या वतीने योग कॉलेजच्या 1. मानसी विनायक दळवटकर 2. अक्षता अशोक साळवी 3.सरस्वती मुरलीधर नंदवंशी या विद्यार्थिनींचे स्पर्धेसाठी सिलेक्शन झाले.
वरील तीनही विद्यार्थ्यांनी गोवा राज्यातील आंतरराष्ट्रीय योग स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करून प्रत्येकी सुवर्णपदक प्राप्त करून महाराष्ट्राचा झेंडा आंतरराष्ट्रीय स्तरावर फडकविला. जिल्ह्यातील सर्व शहरातून वरील विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.
